छत्रपती संभाजीनगर

प्लास्टिक कॉईनवर सुरू होता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जुगार

CD
प्लॅस्टिक कॉइनचा जुगाऱ्यांचा जुगाड ३० जणांना घेतले ताब्यात, सिटी चौक पोलिसांची कारवाई औरंगपुरा, ता. ३१ ः प्लॅस्टिक कॉइनचा वापर करून औरंगपुऱ्यातील पोलिस चौकीसमोर सुरू असलेल्या झन्ना-मन्ना जुगारावर सिटी चौक पोलिसांनी कारवाई केली. रविवारी (ता.३०) रात्री छापा टाकून जुगार खेळणारे १९, कॅरम खेळणारे सहा आणि व्यवस्थापन व साहित्य पुरविणारे पाच, अशा ३० जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाइल, पत्ते, प्लॅस्टिक कॉइन, कॅल्क्युलेटर व रजिस्टर असा ३ लाख १५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक नीतू तायडे यांना मिळालेल्या माहितीवरून रात्री ७ः२० वाजता छापा टाकण्यात आला. तीन टेबलांवर प्लॅस्टिक कॉइन व पैसे लावून १९ जण जुगार खेळताना आढळले. जागामालक विष्णू लेखराज तनवाणी यांच्या मालकीच्या इमारतीत हा प्रकार सुरू होता. तसेच त्यांनी जुगारासाठी परवाना नसल्याचे कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. जुगाऱ्यांकडून ५००, १०००, २०००, एसडी १, एसडी २, अशी चिन्हे असलेले विविध रंगांचे कॉइन मिळाले. गणेश अशोक नवाते, कलीम सलीम पठाण आणि विजय रमेश जडिये हे जुगाराचे साहित्य वाटताना आढळले. ताब्यात घेतले चालक, मालक आणि जुगारी उपनिरीक्षक संजय राठोड यांच्या फिर्यादीवरून विष्णू लेखराज तनवाणी, प्रकाश बाबूलाल चौधरी, महेश सोमीनाथ निकम, अजहर अन्वर मिर्झा, प्रकाश धनराज नैयनाव, सुनील पापाराव मुसळे, रिझवान खालेद शेख, विजय कांतीलाल सूर्यवंशी, चंदर सांडूजी सलामपुरे, शेख रफिक अब्दुल गणी, राजेश दामोधर गरुड, गौतम देवराव हिवराळे, प्रकाश पांडुरंग रिंढे, सय्यद अजिज सय्यद हबिब, शेख शपीक शेख ईसा, अशरद खान आजम खान, शेख नजीर शेख कबीर, जयंत नारायन गुप्ता, किरीट दामोधरदास सोनी, प्रकाश विनायकराव दंख, किशोर सूरज जैन, शेख इब्राहिम शेख साहेब मिहा, विशाल सुरेश लाचुरीया, राजेश श्रावण वानखेडे, अक्रम सलीम कुरेशी, शेख रफिक शेख बदरउद्दीन, गोलू राधेशाम वर्मा, गणेश अशोक नवाते, कलीम सलीम पठाण आणि विजय रमेश जडिये यांच्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. पुढील तपास उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT