Aurangabad police arrested BJP office bearers sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न : छावणीत स्थानबद्ध

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शहरातील पाणीपुरवठा व जनआक्रोशाबाबत १४ मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बुधवारी सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे पोलिस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये बराच गोंधळ झाला होता.

भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर, ओबीसी मोर्चाचे भगवान घडामोडे, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, रामेश्‍वर भादवे, राजेश मेहता, मनसेतून भाजपमध्ये आलेले सुहास दाशरथे, रामेश्‍वर भादवे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा अमृता पालोदकर, सविता कुलकर्णी, माधुरी अदवंत यांनी पाण्यासंदर्भात निवेदन देण्यासाठी आल्यानंतर या सर्व पदाधिकाऱ्यांसह इतरांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना छावणीत स्थानबद्ध केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी शहरातील पाणीप्रश्नसंदर्भात निवेदन देणार असल्याची घोषणा भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. त्यामुळे आज सकाळपासूनच केणेकरांवर पोलिसांनी पाळत ठेवली होती. पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात सीटी चौक पोलिसांनी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा माझ्यावर पाळत ठेवत आमचा आवाज दडपण्याचा ठाकरे सरकारचा डाव असल्याची टीका संजय केणेकरांनी केली. दरम्यान, शिवसेना शाखा वर्धापनाचे औचित्य साधत भाजपने शहरात बॅनरबाजी करीत संभाजीनगर नामकरण, पाणीप्रश्‍न आणि टॅंकरलॉबी याविषयी प्रश्‍न उपस्थित केले.

ऐंशी वर्षीय आजी अन् रिकामे हंडे!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहरात निघालेल्या आक्रोश मोर्चामध्ये ८० वर्षीय जनाबाई मोहिते या आजीने सहभाग घेतला होता. आज मुख्यमंत्री शहरात असल्यामुळे जनाबाई मोहिते या रिकामा हंडा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्या होत्या. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जनाबाई मोहिते यांनाही अटक करण्यात आले. त्यांनाही भाजपच्या पदाधिकाऱ्यासोबत स्थानबद्ध करण्यात आले. श्री. केणेकर, राजू शिंदे, बापू घडामोडे यांच्यासह इतर महिला नगरसेविका, महिला कार्यकर्त्यांनी अचानक मुख्यमंत्री ठाकरे हे थांबलेल्या हॉटेल रामा इंटरनॅशनलसमोर आपल्या वाहनातून हंडे घेऊन आले, ते हंडे मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यावर फेकणार आहे अशी खात्री झाल्याने केणेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे सभा झाल्यानंतर या सर्वांना सोडून देणार असल्याची भुमिका पोलिसांनी घेतली होती.

आक्षेपार्ह मजकुराविरोधात आंदोलन

शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांनी एका वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत ब्राम्हण समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर छापल्यामुळे भाजप आध्यात्मिक आघाडी आणि ब्राम्हण समाजातर्फे चेतन कांबळे यांच्या विरोधात क्रांती चौकात दुपारी एक वाजता आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संजय जोशी, शहराध्यक्ष केणेकर, जालिंदर शेंडगे, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, अनिल मकरिये, सविता कुलकर्णी, अमृता पालोदकर, गीता आचार्य, पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Sangli Bank Election : चंद्रकांत पाटील, विशाल पाटील यांच्यात गुफ्तगू; खासदारांकडून राहुल महाडिक यांना शुभेच्छा, सांगली जिल्‍हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्‍ट

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT