Aurangabad News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad News: लसीकरणाची भिस्त खासगी दवाखान्यांवर

शासनाकडून शहराला मिळेना कोरोना लसींचा साठा

राजेश नागरे

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची साथ पुन्हा येईल, अशी भीती व्यक्त केली जात असून, त्यासाठी शासनस्तरावरून दररोज नवनवीन आदेश काढले जात आहेत. संसर्गापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच मार्ग असल्याने महापालिकेने राज्य शासनाकडे लसींची मागणी केली आहे. पण, अद्याप लसींचा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे लसीकरणाची भिस्त आता खासगी दवाखान्यांवरच राहणार आहे.(Aurangabad News)

कोरोना संसर्गाचा नवा व्हेरिअंट चीन, ब्राझील, अमेरिकेसह इतर देशांमध्ये पसरला आहे. त्यामुळे या देशांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याची दखल घेत केंद्र शासनाने राज्य शासनाच्या माध्यमातून प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी व्हिसीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांशी संवाद साधत तयारी करण्याची सूचना केली आहे. औरंगाबाद महापालिकेकडे शिल्लक असलेल्या लसींची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे महापालिकेने गेल्या आठवड्यात शासनाच्या आरोग्य विभागाला पत्र पाठवून लसींच्या साठ्याची मागणी केली आहे.

सध्या महापालिकेकडे कोवॅक्सिन लसीचे १५००० डोस शिल्लक आहेत. हे डोस ३१ डिसेंबरपर्यंतच वापरता येणार आहेत. त्यामुळे कोव्हिशिल्डच्या पन्नास हजार लसींचा साठा व कॉर्बोव्हॅक्स लसींचा पंधरा हजारांचा साठा मिळावा, अशी मागणी पत्राव्दारे करण्यात आली आहे. पण अद्याप लसींचा साठा महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.

महाराष्ट्राच्या वाट्याला लसींचा साठा प्राप्त झाल्यावर त्यातील काही साठा महापालिकेला देण्यात येईल असे कळवण्यात आले आहे. पण, त्याची तारीख मात्र कळविण्यात आलेली नाही. शासनाकडून लसींचा साठा मिळत नसल्यामुळे लसीकरणाची भिस्त आता खासगी दवाखान्यांवर असल्याचे चित्र आहे.

शासनाकडे लसींची मागणी केली आहे. केंद्र शासनाकडून लस उपलब्ध झाल्यावर महापालिकेला दिली जाईल, असे शासनाने कळवले आहे. त्यानुसार लस उपलब्ध होण्याची आम्ही वाट पाहात आहोत. तसेच मेल्ट्रॉन हॉस्पिटल, आरोग्य केंद्र संभाव्य संसर्गासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.

- डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News : पक्षफोडीचे राजकारण म्हणजे लोकशाहीविरोधी षडयंत्र; अॅड. संजय घाडीगांवकर यांची टीका

EPFO Interest Rate: गुड न्यूज! 'पीएफ'च्या व्याजदरांमध्ये मोठी वाढ; चालू महिन्यातच खात्यात पैसे जमा होणार?

'सनई चौघडे' मालिकेतून एक-दोन नव्हे तीन कलाकारांची एक्झिट; दिसणार नवी अभिनेत्री, शेअर केली भावुक पोस्ट

TCA: मोहम्मद सिराज, तिलक वर्मा आणि अंबाती रायडू अडचणीत? पाठवण्यात आली कायदेशीर नोटिस; नेमकं काय आहे प्रकरण?

Work Visa Rules: सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! वर्क व्हिसा नियम बदलले; भारतीय कामगारांवर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT