Aurangabad Railway Station sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : रेल्वेस्थानकासाठी २२५ कोटींची तरतूद

औरंगाबादेत अडीच वर्षांत पूर्ण होणार काम

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : यूपीए सरकारच्या काळात रेल्वेसाठी अकराशे कोटींची तरतूद केली जात होती. आम्ही केंद्राच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी ११ हजार कोटींची तरतूद करत आहोत. आगामी बजेटमध्येही समाधानकारक तरतूद महाराष्ट्राला मिळणार आहे. तसेच औरंगाबाद आणि जालना रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी सहा जानेवारीला टेंडर काढण्यात आले. यात औरंगाबादसाठी २२५ कोटी तर जालन्यासाठी १७५ कोटींची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी (ता.१२) पत्रकार परिषदेत दिली.

श्री. दानवे म्हणाले की, मराठवाड्यातील रेल्वेच्या तोंडाला पाने पुसली असे आरोप अनेकजण करीत होते. मात्र आता रेल्वेची अनेक कामे झाली आहेत. यात विद्युतीकरण, दुहेरीकरण पीटलाइन, नवीन रेल्वे सुरू करणे अशा अनेक गोष्टी केल्या आहेत. आता २०२३ मध्ये रेल्वेच्या विद्युतीकरण आणि ब्रॉडगेजवर भर दिला जाणार आहे.

सहा जानेवारीला औरंगाबाद आणि जालना रेल्वेस्थानकासाठीचे आधुनिकीकरणासंदर्भात टेंडर काढण्यात आले आहेत. या निविदांची मुदत ९ मार्चपर्यंत असेल. त्यानंतर जून किंवा जुलैपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल आणि अडीच वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानकासाठी कैलास लेण्यांची थीम वापरली जाणार आहे. भव्य अशा रेल्वेस्थानकात हॉटेल्स आणि मॉलही असतील, असेही दानवे यांनी सांगितले.

मार्चपर्यंत धावणार विद्युतीकरणावर रेल्वे

मनमाड ते औरंगाबाद दुहेरीकरणासाठी अम्ब्रेला योजनेतून इस्टिमेट फायनल झाले असून, ते निती आयोगाकडे पाठवण्यात आले आहे. यासह मार्चपर्यंत मुंबई ते औरंगाबाद अशी इलेक्ट्रिसिटीवर रेल्वे धावेल. ही रेल्वे मार्चपर्यंत धावेल, असेही दानवे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT