पावसाने औरंगाबाद शहरात जोरदार हजेरी लावली आहे. 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Rain Updates : औरंगाबादेत पावसाची जोरदार हजेरी

अनिल जमधडे

या पावसाची चिकलठाणा वेध शाळेत २२.२ मिलिमिटर नोंद झाली आहे.

औरंगाबाद : शहरात Aurangabad रविवारी (ता.२७) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने Rain हजेरी लावली. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. अनेक सखल भागात पाणी साचले होते. या पावसाची चिकलठाणा वेध शाळेत २२.२ मिलिमिटर नोंद झाली आहे. मृग नक्षत्र कोरडे गेले असले तरीही आर्द्र नक्षत्रात Adra Nakshatra पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जिल्ह्यात ठिक-ठिकाणी पावसाने जोरदारपणे हजेरी लावली आहे. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. असे असतानाच सायंकाळी जवळपास एक तास जोरदार पाऊस झाला. उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. जिल्ह्यात रोहिणी नक्षत्राचा काही प्रमाणात पाऊस पडल्यानंतर चांगल्या पावसाच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, अपेक्षा असलेले मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे शेतकरी Farmer चिंतातूर झाला होता. मृग नक्षत्रात पाऊस येईल, या अपेक्षेवर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, पेरणी झालेल्या परिसरात पाऊस न पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती.aurangabad rain updates heavy rain in city

या पिकांना जीवदान देण्याचे काम आर्द्र नक्षत्राच्या पावसाने केले आहे. वैजापूर तालुक्यातील शिऊर, चोरवाघलगाव, गोळवाडी, लासूर, कन्नडमध्ये चापानेर, औराळा, हातनूर, वाळूज परिसर, औरंगाबाद, करमाड, गाडीवाट, खुलताबाद तालुक्यात अनेक ठिकाणांसह शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

Jos Buttler: जॉस बटलरचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा फलंदाज; विराट कोहली, रोहित शर्मा टॉप ५ मध्येही नाहीत

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

SCROLL FOR NEXT