तळणी (ता. मंठा, जि. जालना) - जालना जिल्ह्यात काही भागांत शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार बेमोसमी पाऊस झाला. तळणी येथे पावसानंतर शेतात साचलेले पाणी.
तळणी (ता. मंठा, जि. जालना) - जालना जिल्ह्यात काही भागांत शनिवारी वादळी वाऱ्यासह जोरदार बेमोसमी पाऊस झाला. तळणी येथे पावसानंतर शेतात साचलेले पाणी. 
छत्रपती संभाजीनगर

कन्नड तालुक्यात पावसाचे पुनरागमन, पिकांना तात्पुरते जीवदान

संजय जाधव

कन्नड (जि.औरंगाबाद) : मोठ्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी (ता.आठ) कन्नड तालुक्यात पावसाचे पुनरागमन झाले. तालुक्यातील काही भागांत मुसळधार, काही भागांत मध्यम, तर काही ठिकाणी तुरळक पावसाने पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे. सर्वदूर पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गुरुवारी तालुक्यातील देवगाव रंगारी, पिशोर व नाचनवेल भागात मुसळधार व मध्यम जोरदार पाऊस झाला, तर दुसरीकडे चापानेर,औराळा, चिखलठाण, करंजखेड या महसूल मंडळात तुरळक व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गेल्या महिन्याभरापासून पावसाच्या दीर्घ खंडामुळे तालुक्यातील ९९ हजार ७९२ हेक्टर जमिनीपैकी लागवड झालेल्या ८२ हजार १९७ हेक्टर म्हणजे तब्बल ८२.३७ टक्के जमिनीवर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे होते. शेतकरी मिळेल, त्या साधनांनी व मिळेल त्या पर्यायाने पिकांना पाणी घालून त्यांना वाचवण्याची धडपड करत होते.aurangabad rain updates monsoon return in kannad tahsil

तुरळक ठिकाणी पुरेसा ओलावा नसल्याने पूर्ण उतार न झालेल्या पिकांना मोडून शेतकरी दुसऱ्या पेरणीसाठी पावसाची पुन्हा वाट बघत होते. तालुक्याचे जून महिन्याचे सरासरी पाऊसमान १२५.२ मिलिमीटर इतके असून तालुक्यात जून महिन्यात १५१.८ मिलिमीटर इतका म्हणजे १२१.२ टक्के पाऊस पडला. जुलै महिन्यात गुरुवारपर्यंत (ता.आठ) सरासरी पाऊसमान ३९.७ मिलिमीटर इतके असताना प्रत्यक्षात केवळ ५.५. मिलिमीटर म्हणजे १३.९ टक्के पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी ८ जुलैपर्यंत तालुक्यात तब्बल ३१०.७ मिलिमीटर म्हणजे १८८ टक्के इतका प्रचंड पाऊस पडला होता. दरम्यान गुरुवारी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. रात्री उशिरापर्यंत पडलेल्या पावसाने पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे.

तालुक्यात गुरुवारी पडलेला पाऊस (कंसात या हंगामात आतापर्यंत पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये)

कन्नड - १७ मिलिमीटर (१५४)

चापानेर - १५ (२३५)

देवगाव रंगारी - ७८ (२४८)

चिखलठाण - १४ (१०७)

पिशोर - ४५ (२३६)

नाचनवेल - ३८ (१९१)

करंजखेड - १५(२१८)

चिंचोली लिंबाजी - २४ (३२२)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT