Aurangabad Ram Navami Viral Video esakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमधील राम नवमी मिरवणुकीचा Viral Video; मशिदीजवळून जाताना 'भाईचारा'

औरंगाबादमधील राम नवमी मिरवणुकीचा Viral Video

गणेश पिटेकर

औरंगाबाद : देशातील काही भागांमध्ये राम नवमीनिमित्त पार पडलेल्या मिरवणुकी दरम्यान हिंसेच्या घटना घडल्या आहेत. देशात सांप्रदायवाद वाढत चालला आहे का? सध्या धर्मा-धर्मामध्ये भांडण लावण्याचे काम सुरु आहे. महागाई, बेरोजगारी आणि वीजपुरवठा असे अनेक प्रश्न देशासमोर असताना सामाजिक वीण कुठे तरी उसवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. मटण हलाल, मासांहार विरुद्ध शाकाहार असा वाद सुरु आहे. मात्र असं सर्व घडत असताना एक सुखद घटना मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये (Aurangabad) घडली आहे. निमित्त होते राम नवमीचे (Ram Navami). या प्रसंगी युवा सेनेतर्फे काढण्यात आलेली मिरवणूक उस्मानपुरा येथील तारापान जवळील बडी मशिदीजवळ आली असता डिजे आणि घोषणा बंद करण्यात आल्या. (Viral Video Aurangabad Ram Navami Video Viral, It Set Hindu Muslim Unity Example)

मशिदीच्या पुढे गेल्यानंतर पुन्हा डिजे लावण्यात आला आणि घोषणा सुरु झाल्या. या पूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांना मशिदीपुढे गेल्यानंतर आपला डिजे लावला जाईल असे आवाहन करताना युवा सेनेचे (Yuva Sena) उपशहर प्रमुख आदित्य दहिवाळ यांचा आवाज ऐकू येतो. 'ई-सकाळ'शी बोलताना आदित्य म्हणाले, की आपल्या शहरात सर्वधर्म लोक एकत्र राहतात. उस्मानपुरा भागात आम्ही सर्व ईद असो दिवाळी एकमेकांच्या घरी जाऊन साजरा करतो.

अवती-भवती तिरस्काराचे राजकारण वाढत असताना अशी सुखद घटना 'आयडिया ऑफ इंडिया' ला आणखीन बळकटी देते. भारतात एकमेकांच्या धर्माचा आदर पूर्वीपासून केला जातो. आणि तो आजही सुरुच आहे. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे औरंगाबादेतील सदरील घटना.

आदित्य दहिवाळ, उपशहर प्रमुख, युवा सेना, औरंगाबाद

सर्व जातीधर्मांनी गुण्यगोविंदाने एकत्र राहावे. कोणाच्याही भावना दुःखवणे आपला अधिकार नाही. हिंदु-मुस्लिम यांची एकजुट राहणे आवश्यक आहे.

- आदित्य दहिवाळ, उपशहर प्रमुख, युवासेना, औरंगाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT