Rape case
Rape case esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad crime : उसने पैसे वेळेवर न दिल्याने बलात्कार

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : उसने दिलेले पैसे मुदतीत परत केले नाही म्हणून नातेवाईक महिलेवर बळजबरी बलात्‍कार करणाऱ्याला क्रांतीचौक पोलिसांनी शनिवारी (ता. २८) रात्री बेड्या ठोकल्या. शेख मेहमूद शेख महेबूब (वय ४९, रा. अजबनगर) असे आरोपीचे नाव आहे.

त्‍याला ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी एस. एस. घोडके यांनी रविवारी (ता.२९) दिले. या प्रकरणात ३८ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता ही खासगी नोकरी करते. मार्च २०२२ मध्‍ये पीडितेच्‍या मोठ्या मुलाचे लग्न ठरल्याने तिला पैशांची आवश्‍यकता होती. त्‍यामुळे तिने आपल्या नातेवाईक महिलेकडून ५० हजार रुपये उसने घेतले होते.

ही बाब नातेवाईक महिलेचा पती तथा आरोपी शेख महेमूद याला कळली. त्‍याने पीडिता काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन पैसे वेळेवर परत न केल्याने शरीर सुखाची मागणी केली. पीडितेने नकार दिला, मात्र आरोपीने पीडितेवर बळजबरीने इमारतीच्‍या टेरेसवर बलात्‍कार केला. या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल आहे. आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी युक्तिवाद केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Pune Traffic News: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत एक जूनपासून बदल, वाचा महत्वाची बातमी

Railway News: नागरिकांच्या प्रवासावर ब्लॉक नको; मेगा ब्लॉकवर मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

SCROLL FOR NEXT