छत्रपती संभाजीनगर

‘दिव्य कलेक्शन’ उपक्रमात १५० किलो साहित्य संकलित

CD
फोटो, (ABD26J82681) छत्रपती संभाजीनगर ः साहित्य संकलित करताना मोनाली लकडे, रश्मी चिचाणी यांच्यासह इतर. -- ‘दिव्य कलेक्शन’ उपक्रमात १५० किलो साहित्य संकलित छत्रपती संभाजीनगर, ता. ४ ः इनरव्हील क्लब ऑफ औरंगाबाद लोटसच्या पुढाकारातून आणि संपूर्णम नाशिक यांच्या सहकार्याने ‘दिव्य कलेक्शन’ हा विशेष पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत देवतांच्या जुन्या व भग्न झालेल्या मूर्ती, मूर्तीसाठी वापरलेले जुने वस्त्र, धार्मिक पुस्तके, छायाचित्रे तसेच फोटोफ्रेम, अशा सुमारे १५० किलो विविध वस्तू पुनर्चक्रणासाठी जमा करण्यात आल्या. हे साहित्य नाशिक येथे पाठविण्यात आले. या संकलनासाठी सिंधी कॉलनी सोसायटीच्या ग्राउंडवर कलेक्शन सेंटर उभारण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी सहभाग नोंदवत जवळपास १५० किलो साहित्य पुनर्चक्रणासाठी जमा केले. हे सर्व साहित्य पुढील प्रक्रियेसाठी संपूर्णम, नाशिक यांच्याकडे पाठविण्यात आले. धार्मिक श्रद्धेचा आदर राखत जुन्या व वापरात नसलेल्या धार्मिक वस्तूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या उपक्रमासाठी इनरव्हील क्लब ऑफ औरंगाबाद लोटसच्या प्रेसिडेंट मोनाली लकडे, रश्मी चिचाणी, स्वाती मोरे, वैशाली सदगुले, नाशिकच्या संगीता गायकवाड आणि वर्षा गायकवाड यांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

MSRTC strike Diwali: ऐन दिवाळीत 'एसटी'चा संप! कर्मचाऱ्यांनी दिली राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा! किनीतील आंदोलनामुळे कोगनोळीत ट्रकच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

कोणाकडे तरी आकर्षित होऊन... वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी का केलं दुसरं लग्न? आता सांगितलं कारण, म्हणाले-

SCROLL FOR NEXT