bidkin 
छत्रपती संभाजीनगर

बिडकीन 'पोलिस पेट्रोल पंपा'चे भूमिपूजन; नफा 'पोलिस वेल्फेअर निधी'मध्ये जाणार

गणेश सोनवणे

बिडकीन (औरंगाबाद) : गुरुवारी बिडकीन पोलिस पेट्रोल पंपाचा भूमिपूजनचा कार्यक्रम पार पडला. ग्रामीण पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी इंडियन ऑइलचे कार्पोरेशनचे उपमहाप्रबंधक सुहास तूमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. बिडकीन येथील पोलीस कॉलनी वसाहत डी एम आय सी च्या रोडवर तीन  एकर  क्षेत्रामध्ये आहे.

या जागेचा पोलीस वसाहती शिवाय पोलिसांच्या फायद्यासाठी वापर होऊ शकतो हे लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील यांनी याठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्याचे ठरविले. या पेट्रोल पंपाचा नफा हा पोलिस वेल्फेअर निधीमध्ये वर्ग केला जाणार आहे. त्यादृष्टीने या ठिकाणी पेट्रोल पंपाचे काम सुरू करण्यात आले असून आज त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

यावेळी पैठणचे पोलीस उपअधीक्षक गोरख भामरे शिवसेना तालुका उपतालुकाप्रमुख मनोज पेरे, मंडळ निरीक्षक ठेंगे, तलाठी बोंद्रे, ग्रामसेवक नारायण पाडळे, एल अँड टीचे अधिकारी आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरख भामरे यांनी केले त्यावेळी त्यांनी पोलिस पेट्रोल पंपसाठी मदत करणारे मंडळ अधिकारी, तलाठी, एल अँड टी कंपनीचे अधिकारी यांचे आभार मानले.

याप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील म्हणाल्या की, 'पेट्रोल पंपाच्या माध्यमातून जो पैसा येणार आहे तो पोलिस वेल्फेअर निधीमध्ये वर्ग केला जाणार आहे. पोलिसांच्या हितासाठी त्यांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी खर्च करण्यात येईल. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज उदावंत पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील,प्रशांत मुंढे, पोलीस नाईक भगवान जाधव, अनंत घोळवे, गोविंद राऊत, अभिजित सोनवणे, विष्णू गायकवाड, आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या कुटुंबाच्या कल्याणाकरीता व अडचणीच्या वेळी पेट्रोलपंपाच्या  नफ्याचा उपयोग करता येणार आहे- मोक्षदा पाटील 
(पोलिस अधिक्षक ग्रामीण  औरंगाबाद)

(edited by- pramod sarawale) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पोलिसांसोबत कर्तव्य बजावणारे ९०० होमगार्ड मानधनाविना

SCROLL FOR NEXT