Auranagabad Sambhajinagar Team eSakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद की संभाजीनगर? सरकारच्या जीआरवरून पुन्हा वाद

हिम्मत असेल तर नाव बदलून दाखवा; खा. जलील यांचा इशारा

सुधीर काकडे

औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा पून्हा एकदा समोर आलाय. राज्य सरकारच्या एका जीआरमध्ये संभाजीनगर असा उल्लेख केल्यानं या वाद उफाळून आला आहे. सरकारकडूनच असा उल्लेख करण्यात आल्यानं सरकारकडून नामांतरासाठी हालचाली सुरु केल्याचं सांगण्यात येतंय. गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा चर्चेत आहे.

जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत सरकाकडून औरंगाबादच्या राम भोगले यांची निवड करण्यात आली. यावेळी सरकारकडून काढण्यात आलेल्या जीआरवर त्यांच्या नावासमोर संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आलाय. तर या प्रकरणावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालंच असून, फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याचं सांगितलं.

हिम्मत असेल तर संभाजीनगर करून दाखवा : खा. जलील

औरंगाबाचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारच्या जीआरवर संभाजीनगर नावाचा उल्लेख केल्याचा विरोध केला आहे. निवडणूक आली की हे धंदे सुरू होतात. ज्या अधिकाऱ्याने या जीआरवर सही केली त्यांना बडतर्फ करावे. तूम्ही तुमच्या मर्जीनुसार शहराचं नाव बदलू शकत नाही. सरकार तुमचं आहे, हिम्मत असेल तर करून दाखवा असा इशारा जलील यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : शिवसेना शिंदेंचीच अन् राष्ट्रवादी अजितदादांची! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर CM फडणवीसांचे भाकीत; राजकीय वर्तुळात चर्चा

IND vs SL 1st Test : बुमराहची अनुपस्थितीत, दोन गोलंदाजांपैकी निवडू कोणाला? शुभमन गिल पहिल्या सामन्यापूर्वी पेचात अडकला, म्हणाला...

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

अमिताभ बच्चन यांच्या ‘जुम्मा चुम्मा दे दे’ गाण्याने रातोरात स्टार झाली, कुटुंबासाठी सोडली इंडस्ट्री; आता कुठे आहे अभिनेत्री?

Marathi News Live Updates : शिवसेना अन् राष्ट्रवादी कुणाची? २०२४ च्या 'लोकन्यायालया'चा दाखला देत फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला

SCROLL FOR NEXT