संभाजीराजे sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : शिवचरित्र पारायण वाचन उपक्रम देशात पहिलाच ; संभाजीराजे

दुसऱ्या दिवशी मराठी व उर्दू १२ शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शिवचरित्र पारायण सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता.१४) भाजप जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तर मिलिंद पाटील यांच्या हस्ते पारायण वाचन सुरू झाले.

सोहळ्यात संभाजीराजे छत्रपती यांनी शिवचरित्र पारायणाची सांगता शिवआरती करून केली. संभाजीराजे म्हणाले, की हा शिवचरित्र पारायण वाचनाचा कार्यक्रम देशातील पहिलाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यात जात-धर्म न पाहता, सैनिकाच्या शौर्यावर, मर्दुमकीवर, त्याच्या इमानावर सैन्यात भरती करून पदे दिली.

शिरीष बोराळकर म्हणाले की, औरंगाबादमधून हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्‍चन सर्व धर्मीयांना बरोबर घेऊन हा शिवचरित्र पारायण वाचनाचा कार्यक्रम आपल्या शहरातून होत आहे. सर्व माध्यमाची मुले-मुली यामधे सहभागी होत आहेत. यातून सामाजिक एकतेचा संदेश जात आहे.

दुसऱ्या दिवशी मराठी व उर्दू १२ शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडे, भाषणे सादर केली. चार वर्षांच्या स्वराजने सुंदर खड्या आवाजात पोवाडा गायला. सप्ताह समितीचे संस्थापक प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, एस. पी. जवळकर, मिर्झा सलीम बेग, गोविंद गोंडे पाटील, श्रीमती शिंदे, श्रीमती जाधव, दिव्या पाटील, रेखा वहाटुळे यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाण्यात चाललंय काय? आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबावर बहिष्कार; कौटुंबिक, व्यावसायिक संबंध ठेवण्यास बंदी

IPL 2026, RR vs MI: मुंबई इंडियन्सने 'त्या' मॅचविनर खेळाडूला राजस्थान रॉयल्सविरुद्ध का खेळवलं नाही? कोचने केला मोठा खुलासा

2,20,00,00,000 इतकी आहे सनी देओलची संपत्ती, मुंबईपासून UK पर्यंत आहेत आलिशान घरं, 100 एकर जमीन आणि बरंच काही

भाईला 'बाई' करू, पुणे डीसीपींचे अजब विधान; लक्षात येताच तिथंच स्पष्ट केलं

BEST Bus: कर्मचारी कमी; मुंबईची लाइफलाइन धोक्यात! बेस्ट बस कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढणार? मोठा निर्णय लवकरच

SCROLL FOR NEXT