Aurangabad Siddharth Udyan Children water boat sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानात होणार मुलांसाठी ‘वॉटर बोट’

१५ मेपासून सुविधा : ५० रुपये असेल तिकीट

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या बाल पर्यटकांना आता वॉटर बोटींचा आनंद लुटता येणार आहे. १५ मेपासून ही सुविधा उद्यानात असेल. त्यासाठी ५० रुपये तिकीट आकारले जाणार आहे. तुळजाई एन्टरप्रायजेसतर्फे हा प्रकल्प सुरू केला जाणार असून, दहा वर्षासाठी प्रशासनाने करार केला आहे.

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयाला दरवर्षी मराठवाड्यासह विदर्भ, खानदेशातील हजारो पर्यटक भेटी देतात. त्यात सहलींचा देखील समावेश असतो. त्यामुळे महापालिकेने सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय अधिक आकर्षित करण्यासाठी पावले उचलली आहेत. स्मार्ट सिटी अभियानातून काही महिन्यांपूर्वी याठिकाणी सुपर हिरोचे पुतळे लावले आहेत. हे पुतळे लहान मुलांचे आकर्षण ठरले आहेत. त्यानंतर आता तुळजाई एन्टरप्रायजेससोबत प्रशासनाने पाच ते १२ वयोगटातील मुलांच्या मनोरंजनासाठी मुव्हेबल रबर वॉटर टँकमधील वॉटर बोट व इतर खेळणी उभारणे, परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी दहा वर्ष प्रकल्प चालविण्यासाठी करार केला आहे.

त्यासाठी एजन्सीकडून एक लाख रुपयाच्या सुरक्षा अनामत रक्कम भरून घेतली जाणार आहे. या प्रकल्पासाठी २० बाय ३० आकाराची महापालिका जागा उपलब्ध करून देणार आहे. याठिकाणी बोटींग करण्यासाठी ५० रुपये प्रति बालक प्रवेश शुल्क असेल. प्रत्येक महिन्याच्या उत्पन्नातून २५ टक्के रक्कम रॉयल्टी म्हणून महापालिकेला द्यावी लागेल. दरवर्षी प्रवेश फी व रॉयल्टीमध्ये दहा टक्के भाववाढ केली जाईल, अशा अटी टाकण्यात आल्या आहेत. वॉटर बोट १५ मे पर्यंत सुरू होतील, त्यानुसार तयारी सुरू आहे, असे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.

शालेय सहली, ग्रुपसाठी २५ टक्के सूट

उद्यानात येणाऱ्या शालेय सहलींना काही प्रमाणात सूट दिले जाते. त्यानुसार वॉटर बोटसाठी देखील सूट मिळणार आहे. प्रति बालकास ५० रुपये फीस आकारण्यात येणार असली तरी शालेय सहली आणि शालेय विद्यार्थी ग्रुपने आल्यास त्यांना २५ टक्के सवलत दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT