Aurangabad Smart City lighthouse project 109 people employed sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : लाईटहाऊस उपक्रमात १०९ जणांना रोजगार

स्मार्ट सिटीअंतर्गत उपक्रम : शहरातील ६०८ जणांनी घेतले प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरातील होतकरू सर्वसामान्य तरुणांना त्याच्या आवडीनुसार प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत लाइट हाऊस उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात आतापर्यंत १०९ जणांना रोजगार मिळाला आहे.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व लाइट हाऊस फाउंडेशन यांनी हा उपक्रम सुरू केले आहे. या उपक्रमात आतापर्यंत ६०८ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. ६० महिला प्रशिक्षणार्थीचा त्यात समावेश आहे. यातील १०९ विद्यार्थी नोकरी करत आहेत तर ५० पेक्षा जास्त जणांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. संजयनगर, मुकुंदवाडी, आंबेडकरनगर, पदमपुरा, जयभिमनगर, हर्सुल, किल्लेअर्क, मिसारवाडी, रोशनगेट, मेहेरनगर, गारखेडा, पडेगाव या भागातील विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

सिडको एन-५ येथील कम्यूनिटी सेंटर येथे कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी ऑफिस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, जनरल ड्यूटी असिस्टंट, अकाऊंट व टॅली, फिटनेस ट्रेनर, ब्युटी केअर, फुल स्टॅक डेव्हलपर, टेलरिंग अ‍ॅडव्हान्स, इलेक्ट्रिशियन, हॉस्पिटल फ्रंन्ट ऑफिस व बिल्डींग एक्झिक्युटिव्ह, पायथोन, कॉस्मेटोलॉजी असे कोर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, महापालिकेच्या उपायुक्त तथा स्मार्ट सिटीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी, स्नेहा नायर, प्रकल्प सहयोगी किरण आढे यांनी पुढाकार घेतला आहे.

या क्षेत्रात मिळाल्या संधी

प्रशिक्षण घेतलेल्या पैकी टेलिकॉम क्षेत्रात-१८, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये- १७, रिटेलमध्ये- १६, आरोग्य क्षेत्रात- १०, शासकीय तात्पुरत्या स्वरूपात- ६, सोशल सेक्टरमध्ये-६, शिक्षण क्षेत्रात- ५, खाद्यक्षेत्रात- ५, सेवा पुरवठा क्षेत्रात- ५ व फिटनेस क्षेत्रात रोजगार मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT