Aurangabad student data selling school Action
Aurangabad student data selling school Action sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : विद्यार्थ्यांचा डेटा विकणाऱ्या 'शाळांवर कारवाई'

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसोबतच्या अत्याचाराच्या घटना दररोज कानावर पडतात. त्यामुळे सुरक्षेसाठी शासकीय शाळांसोबत खासगी शाळांमध्येही सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे असताना काही शाळांकडील विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती खासगी शिकवणी वर्गाकडे गेल्यामुळे सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची माहिती विक्री करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.

नुकत्याच दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. उन्हाळी सुटीत अनेक पालक पाल्याच्या पुढील शिक्षणासाठी खासगी शिकवणी वर्गाचा आधार घेतात. हीच बाब हेरून खासगी शिकवणीचालक शहरातील नामांकित शाळा, महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती विकत घेतल्याचे निदर्शनास आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या घराचा पत्ता, इयत्ता, जन्मतारीख, मोबाइल नंबर, वडिलांचा व्यवसाय अशी वैयक्तिक संपूर्ण माहिती खासगी शिकवणी वर्गाकडे जमा होते. आपली वैयक्तिक माहिती शाळा, महाविद्यालयांकडे सुरक्षित राहील, या अपेक्षेने पालक सर्व माहिती शाळांना देतात. परंतु, आपल्या खासगी माहितीचा व्यवसाय होत असल्याने पालकांची चिंता वाढली होती.

याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची शिक्षणाधिकारी यांनी दखल घेतली असून याबाबत पत्रक जारी केले आहे. या पत्रात म्हटले, की विद्यार्थी व पालकांनी शालेय प्रवेशासाठी आवश्यक असलेली माहिती केवळ शाळेतील शैक्षणिक हेतूसाठी दिलेली असते. त्यामुळे सदरची माहिती कुणालाही उपलब्ध करुन देता येणार नाही. यापुढे अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे नाव, जात, जन्मतारीख अशी वैयक्तिक माहिती पालकांच्या परवानगीशिवाय परस्पर पुरविण्यात येवू नये. ही बाब निदर्शनास संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT