suicide note
suicide note sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : सर, आम्हाला भाऊ होईना म्हणून...;नववीतल्या मुलीच्या सुसाईड नोटने शिक्षकांसह पोलिसही हादरले!

सुषेन जाधव

औरंगाबाद : ज्ञानेश विद्यामंदिरातील एका नववीच्या विद्यार्थिनीने शाळेत एक चिठ्ठी लिहिली. त्यात ती ‘मी आत्महत्या करतेय, कोणालाही जबाबदार धरू नका’ असे लिहून ठेवले होते. हा प्रकार पाहून शाळा प्रशासन हादरून गेले, मात्र चौकशीअंती तिने चिठ्ठीत आत्महत्येचं लिहिलेलं कारण समाजाला विचार करण्यास भाग पाडणारं होतं. तिने शिक्षकांना सांगितलं, ‘सर, आम्ही तीन बहिणीच आहोत...आम्हाला भाऊ होत नाही म्हणून बाबा आईला रोजच मारहाण करतात, मला ते बघवत नाही, याउलट मलाच मरावं वाटतं.’ मुकुंदवाडीतील एका शाळेत घडलेली घटना पोलिसांसमोर सांगताना शिक्षकही चिंताग्रस्त असल्याचे दिसून आले.

निमित्त होते, ‘विद्यार्थ्यांची सुरक्षा’ या विषयावरील शिक्षणाधिकारी, शिक्षक, पोलिस यांच्यातील कार्यशाळेचे. पोलिस आयुक्तालय, महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यातर्फे संत एकनाथ रंगमंदिरात ही कार्यशाळा २ डिसेंबररोजी पार पडली.

व्यासपीठावर दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस, उपायुक्त अपर्णा गीते, उपायुक्त शीलवंत नांदेडकर, उपायुक्त दीपक गिऱ्हे, शिक्षक विभागाच्या उपायुक्त नंदा गायकवाड, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, महापालिका शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांची प्रमुख उपस्थिती होती.

अनेक शाळांत अजब प्रकार उघडकीस

एका मुख्याध्यापकाने पोलिसांना सांगितले की, मुकुंदवाडीतील माझ्या शाळेत एक विद्यार्थी मास्क घालून येतो, मात्र त्याने व्हाइटनरची नशा केलेली असते, शिक्षकांनाही तो घाबरत नाही. तसेच शाळेजवळील मोकळ्या मैदानावर शाळा सुटण्याच्या वेळेस टपोरी मुलं बसलेली असतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मुकुंदवाडी पोलिसांना वारंवार पत्रे दिली, तरी पोलिसांनी दखल घेतली नाही.

दामिनी पथकांची नुसतीच मार्गदर्शने

काही शिक्षकांनी सांगितले की, आमच्या शाळेत दामिनी पथक येऊन गेले, मात्र त्यांनी नुसते मार्गदर्शन केले. मार्गदर्शन आम्हीही करूच; पण बहुतांश शाळा परिसरांमध्ये गस्त नसल्याची खंत शिक्षकांनी बोलून दाखविली.

कोठे काय परिस्थिती?

ज्ञानेश विद्यामंदिर शाळा मुकुंदवाडीः शाळा सुटण्याच्या दरम्यान जवळच्या मैदानावर टपोरी मुलं बसलेली असतात, अनेकवेळा छेड काढतात. येथे स्पीडब्रेकर हवे.

सेव्हन हिल्सवरील फ्रान्सिलिस शाळेजवळच बार, शंभर मीटर अंतराच्या आतच मिळते बीडी, सिगारेट.

महापालिका शाळा : शाळा भरण्याच्या वेळेत सकाळी रस्त्यावर सेंट्रल नाका परिसरात भटक्या कुत्र्यांनी लहान विद्यार्थ्याला लचके तोडले.

बळीराम पाटील शाळा ः मुलींना इशारे करणारे टपोऱ्यांचे टोळके

विविध ठिकाणे ः रात्री उशिरापर्यंत, तसेच वाढदिवस साजरा करण्यासाठी मध्यरात्री बारा वाजता चौकाचौकात केक घेऊन जमलेले टपोरी.

सभु, शारदा मंदिर, आ.कृ. वाघमारेः शाळा सुटल्यानंतर टपोरी मुलांचे टोळके, शाळेतील आणि बाहेरीलसुद्धा टपोरी.

महापालिका शाळा चिकलठाणा ः शाळा सुटल्यानंतर टपोरी मुलं मुलींना छेडतात, व्हाइटर नशा करतात, मुलींचे फोटोही काढतात. एमआयडीसी सिडको पोलिसांनी आजवरच्या एकाही अर्जाची दखल घेतली नसल्याचे शिक्षकाने पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले.

मिलिंद इंग्लिश प्रायमरी, छावणीः रिक्षाथांब्यावरचे रिक्षाचालक शाळेच्या आतमध्ये आवारात लघुशंका करतात, त्याचवेळेस दहावीच्या मुली ये-जा करत असतात.

छत्रपती हायस्कूल विजयनगरः शाळेजवळ गतिरोधक हवेत.

मौलाना आझाद महाविद्यालय, रोझाबाग ः छोट्या छोट्या टपऱ्यांवर सिगारेट मिळतात, मुलं आवारातच नशा करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT