Andheri East Constituency  esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : ‘अंधेरी’साठी तिघांचे अर्ज

अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी तीन उमेदवाराचा अर्ज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी जागेसाठी आजपर्यंत तीन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे. दोन अपक्ष आणि क्रांतिकारी जय हिंद सेनेच्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १७ ऑक्टोबरपर्यंच आहे. मतदान ३ नोव्हेंबर रोजी तर मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी आपले नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहे.

मुरजी पटेलांचा अर्ज आज

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा गोंधळ वाढताच भाजपने सावध भूमिका घेतली आणि पक्षाचे उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा मुहूर्त पुढे ढकलला. लटके यांच्या राजीनाम्याच्या वादावर उच्च न्यायालयाच्या निकाल दिल्यानंतर पटेल यांचा अर्ज शुक्रवारी (ता.१४) भरला जाईल, असे पक्षातर्फे कळविले आहे.

या मतदारसंघातील शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, मुंबई महापालिकेच्या सेवेच्या राजीनाम्यावरून पेच निर्माण झाला होता. शेवटी तो न्यायालयात गेल्याने भाजप आणि शिंदे गटाने नव्या चाली रचल्या होत्या.

ऋतुजा यांचा अर्ज न आल्यास या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्यासाठी भाजप, शिंदे गट प्रयत्नशील होता. त्यातच लटके कुटुंबीयांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने केला होता.

भाजपने उमेदवारी जाहीर केलेले पटेल हे आज अर्ज भरणार होते. त्यासाठी पक्ष आणि पटेल समर्थकांकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. न्यायालयाचा निकाल शिवसेना आणि लटके यांच्याविरोधात गेला असता; तर ही जागा शिंदे गटाला सोडण्याची तयारी भाजपची असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT