Paithan Municipal Council News 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाकडे लक्ष, मात्र पैठण नगरपालिकेची विकासकामे रखडली

चंद्रकांत तारू

पैठण (जि.औरंगाबाद) : कोरोना संसर्गामुळे येथील नगरपालिकेतील कार्यशैलीत पूर्णपणे बदल होऊन मूळ कामे बाजूला ठेवून कोरोना संसर्गाशी संबंधित कार्यावर भर देण्याचे काम नगरपालिकेला करावे लागत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये इतर विकासात्मक कामे रखडली आहे. विकासकामे सोडून कर्मचाऱ्यांना कोरोना जनजागृतीवर भर देण्याची वेळ आली आहे. मार्च 2020 मध्ये कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर नगरपालिकांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहर निर्जतुकीकरण , कोरोना बाबतची जनजागृती , दुकान , प्रतिष्ठान व्यावसायिकांनी नियमांचे पालन करण्यासंदर्भात लक्ष ठेवण्यासह विविध कार्यावर भर देण्यात आला.

यामुळे शहरातील रस्ते, पाणी, पथदिवे आदी कामांकडे दुर्लक्ष करावे लागले. कोरोनाच्या संकटातून शहरवासीयांना दूर ठेवण्यासाठी नगरपालिका विविध उपाययोजना करीत आहे.नगरपालिकेत अत्यावश्यक कामाशिवाय न येण्यासह ऑनलाइन कार्यावर भर देण्यात आला आहे. रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. नगरपालिकेतील प्रत्येक विभागात कोरोनाबाबत दक्षता घेतली जात आहे. प्रत्येक विभागातील अधिकारी, कर्मचारी मास्क घालून काम करीत आहे.

तसेच शहरातील मुख्य कोरोनाबाबत रस्त्यांवर, चौकामध्ये ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. कर वसुलीसह इतर कामे प्रभावित झाली असुन नगरपालिकेतील अनेक विभागातील अधिकारी , कर्मचारी यांना कोरोना संसर्ग उपाययोजना , जनजागृतीचे कार्य करावे लागत आहे. त्यामुळे कर विभागावर ही मोठा परिणाम झाला आहे. दरवर्षी होणारी कर वसुली व कोरोना काळातील कर वसुलीमध्ये मोठ्या प्रमाणात घटली आहे. पालिका मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी कोरोनाचा संसर्ग वाढु नये. यासाठी कडक नियंत्रण ठेवले आहे


कामाचा ताण वाढला असुन कोरोना बाधितांमध्ये वाढ झाल्याबरोबर नगरपालिकेत असलेल्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेतील कामांसह कोरोनाची कामे सोपविण्यात आल्याने कामाचा ताण वाढला आहे . तसेच कर्मचारीच स्वत : बाधित ठरत असल्याने कर्मचारी संख्या ही कमी होत आहे. त्यामुळे एकुणच कामकाजावर परिणाम झाला आहे.
- सुरज लोळगे, नगराध्यक्ष, पैठण.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT