bulls death esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : विजेच्या धक्क्याने दोन बैलांचा मृत्यू

वडोदबाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

सकाळ डिजिटल टीम

माणिकनगर : विजेच्या धक्क्याने दोन बैलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवाची घटना शुक्रवारी (ता. २१) सकाळी गेवराई सेमी (ता. सिल्लोड) येथे घडली. अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी गेवराई सेमी परिसरात रिमझिम पाऊस झाला. काही वेळाने एकनाथ सांगळे हे बैलांसह इतर जनावरे चरण्यासाठी सुळ्याच्या डोंगराकडे घेऊन जात होते.

गेवराई सेमी ते उमरावती रस्त्यातील चौफुलीवर असलेल्या रोहित्राचा शॉक लागून दोन बैलांचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य पाहून एकनाथ सांगळे यांनी इतर जनावरांना बाजूला हटविले. घटनेची माहिती मिळताच महावितरणने वीजपुरवठा बंद केला.

सहायक अभियंता सईद खान यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ तंत्रज्ञ विजय गोराडे, दत्ता गोराडे, शैलेश कांबळे यांनी घटनास्थळी भेट देवून अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला. तसेच तलाठी प्रशांत देवगया यांनीही प्राथमिक पाहणी करून अहवाल तहसील कार्यालयास सादर केला. तर, वडोदबाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर बिट जमादार फकीरचंद जारवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सांगळे कुटुंबावर संकट

गेवराई सेमी येथील एकनाथ सांगळे हे अल्पभूधारक असून, त्यांच्याकडे असलेली शेतीही कोरडवाहू आहे. सततच्या पावसामुळे शेत नापिक झाले आहे. घरातील पाच जण कसाबसा उदरनिर्वाह करीत आहेत. यातच दोन बैलांचा मृत्यू झाल्याने एकनाथ सांगळे यांचे एक लाख वीस हजारांचे नुकसान झाले आहे. सदरील कुटुंबाला शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT