robbery sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : शहर परिसरात दोन घरफोड्या, दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास

जवाहरनगर, सातारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहर परिसरात दोन ठिकाणी घरफोड्या करत चोरट्यांनी दागिन्यांसह सोन्या चांदीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत विलास मधुकरराव हस्तक (६७, रा. चंद्रगुप्तनगरी, रामतारा हाऊसिंग सोसायटी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ते २० ऑगष्ट रोजी पत्नीसह पुण्यात राहणाऱ्या मुलास भेटण्यासाठी गेले होते. २८ ऑगष्टरोजी घरी आले असता, त्यांना दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला.

चोरी गेलेल्या दागिन्यात तीन तोळ्यांचे मंगळसुत्र (अंदाजे किमत ९६ हजार रुपये), पाच ग्रॅमचे तीन अंगठ्या(२० हजार), तीन मोत्यांचा माळा (एक हजार) आणि पाच हजार रुपये रोख असा एकूण एक लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे समोर आल्यानंतर हस्तक यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली असता, संशयितांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाल्मीसमोरचे घर फोडून दागिने लंपास

दुसऱ्या घटनेत चालकाचे घर फोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे चार तोळ्यांचे दागिने लंपास केले. ही घटना २१ ते २८ ऑगस्ट दरम्यान सुमंगल गार्डन, वाल्मीसमोर, कांचनवाडी येथे घडली. सुहास विनायकराव कुलकर्णी (५९, रा. रो-हाऊस, बी-६, सुमंगल गार्डन, वाल्मीसमोर) हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते.

हीच संधी साधून चोराने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. लाकडी कपाटातून ४ तोळ्याचे सोन्याचे दागिने यामध्ये २ नेकलेस, २ अंगठ्या, १ कर्णफुले, १ कानातील वेल, अर्धा किलो चांदीच्या वस्तू यामध्ये वाट्या, २ निरांजणी, २ फुलपात्र, २ मोरनी, २६ धोंडे, २ ताट, १ अत्तरदानी, १ ताम्हण आणि २ चैन असा मुद्देमाल चोराने लंपास केला. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक देविदास शेवाळे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT