Dr. Bhagwat Karad ,Chandrakant Khair sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : तिळगुळ घ्या अन् भाजपमध्ये या!

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची चंद्रकांत खैरेंना ‘ऑफर’

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक दिग्गज हे भाजपत गेले. काही वाटेवर आहेत. केंद्रात आणि राज्यात बलवान झालेल्या भाजप पक्षात दिग्गजांना ओढण्याचे कामही सुरु आहे. याच मकरसंक्रांतीच्या निमित्ताने रविवारी (ता.१५) केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, खासदार व्हा अन् भाजपमध्ये या अशी थेट ऑफरच दिली. खासदार होईल, पण तो शिवसेनचा अन् आमच्या हिंमतीवर असे थेट उत्तर चंद्रकांत खैरेंनी देत डॉ.कराडांची ऑफर धुडकावून लावली. यामुळे दिवसभर या ऑफरचीच सर्वत्र चर्चा रंगली होती.

मकरसंक्रांती निमित्त भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये यांच्या निराला बाजार येथील निवास्थानी दरवर्षी पतंगोत्सव ठेवण्यात येतो. यात सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रित केले जाते. यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, सहकार मंत्री अतुल सावे यांनी या महोत्सवास हजेरी लावली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी या ठिकाणी भेट दिली. त्याचवेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि नंदकुमार घोडेले उपस्थिती होते.

डॉ.कराड यांनी खैरे यांना तिळगूळ भरविताना गोडगोड बोला अन् खासदार होत आमच्याकडे (भाजप) या, मी थांबतो असे सांगितले. त्यानंतर तत्परता दाखवीत खैरे यांनी आपल्या स्टाईलमध्ये खासदार होणार पण शिवसेनेचे तेही आमच्या हिमतीवर असे उत्तर दिले. अशा प्रकारे त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री कराड यांची ऑफर धुडकावून लागली. यानंतर शिवसेने अस्तित्व संपवित हा जिल्हा भाजपचा बालेकिल्ला बनविण्यासाठीच अशा प्रकारे ऑफर देत असल्याचेही चर्चा सुरु झाली आहे. या पतंग महोत्सवास भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरिष बोराळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

अंबादास दानवे हजेरी

या उत्सवात विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी हजेरी लावली. त्याच वेळी दानवे आणि केंद्रीयमंत्री डॉ.कराड एकत्र येत पंतगबाजीचा आनंद घेतला. यावेळी एकमेकांनी राजकीय टोलो मारण्याची संधी दानवे-डॉ.कराड इतरांनी सोडली नाही. एरवी एकमेकांविरोधात बोलणारे नेते येथे मनसोक्त गप्प मारताना दिसले.

नव्या चेहऱ्याला संधी मिळणार

-औरंगाबाद मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो ताब्यात घेण्यासाठी भाजपतर्फे विशेष लक्ष देण्यात येत आहे. याच संदर्भात केंद्रातील मंत्र्यांनी चार ते पाच बैठकाही घेतल्या आहेत. गेल्या वेळी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे शिवसनेच्या हातून ही जागा गेली. आता शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यामुळे शिंदे गटाकडून कोणीच तयारी करीत नसल्याने औरंगाबादच्या लोकसभेच्या जागेवर भाजपतर्फे दावा सांगितला जात आहे. यात सध्या घडीला केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड तयारी करीत आहे. मात्र यात संधी कोणाला मिळणार असून जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे इतर पक्षातून येणाऱ्यांनाही संधी मिळण्याची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT