औरंगाबाद महापालिका sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : शहराच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १९३ कोटी

जीवन प्राधिकरणाचे ‘वेट ॲण्ड वॉच’

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहराच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १९३ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना तातडीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पण सुरवातीला निविदा प्रक्रियेला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद व आता या योजनेला प्रशासकीय मान्यता नसल्याने काम थंडबस्त्यात पडले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सध्या प्रशासकीय मान्यतेची वाट पाहत आहेत.

शहरासाठी नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम केले जात आहे. शासनाने १,६८० कोटी रुपयांच्या योजनेला सुरवातीला मान्यता दिली होती. त्यानंतर ही योजना केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये टाकण्यात आली. त्यानंतर योजनेची किंमत २,७४० कोटींवर गेली.

या योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी २०२४ उजाडणार असल्याने त्यापूर्वी शहराला तात्पुरता दिलासा देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १९३ कोटी रुपये खर्च करून जुन्या ७०० मिलिमीटर योजनेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्याने ही योजना काही काळ रखडली.

नव्या शिवसेना-भाजप सरकारने पाणीपुरवठा योजना अमृत-२ मध्ये टाकताना त्यातच १९३ कोटींच्या योजनेचा समावेश केला. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत निविदा प्रक्रिया राबविली जात

आहे. कामाचे चार टप्पे करण्यात आले आहेत. तीनवेळा निविदा काढल्यानंतर प्रतिसादही मिळाला; पण निविदा प्रक्रिया अद्याप अंतिम करण्यात आलेली नाही. कारण या योजनेला अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. जोपर्यंत प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत निविदा प्रक्रिया अंतिम करता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आचारसंहितेचा आला अडसर

मुंबई येथे दोन दिवसांपूर्वी उच्चस्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठकही ऐनवेळी आचारसंहितेचे कारण देत रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जोपर्यंत योजनेला प्रशासकीय मान्यता मिळत नाही, तोपर्यंत जीवन प्राधिकरणाला निविदा अंतिम करून कामाला हिरवा कंदील दाखवता येणार नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT