नळ कनेक्शन  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : आत्ता आठवले बेकायदा नळ!

भावसिंगपुरा भागात दिवसभरात तोडल्या १६४ नळजोडण्या

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यात बेकायदा नळ कनेक्शन बंद करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, या पथकाने ज्या भागात नागरिकांच्‍या तक्रारी आहेत, तिथे बेकायदा नळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. भावसिंगपुरा भागात एकाच पाइपलाइनवर हजारो बेकायदा नळ असल्याचे समोर आले होते. त्यानुसार मंगळवारपासून (ता. २४) कारवाई सुरू करण्यात आली आहे. दिवसभरात नवयुग कॉलनी, भावसिंगपुरा भागातील १६४ बेकायदा नळ तोडण्यात आल्याचे पथकप्रमुख तथा मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले.

उन्हाळा सुरू झाल्यापासून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही भागात आठ-नऊ दिवसांनंतर तर काही ठिकाणी चार-पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत होता. विशेषतः सिडको-हडको भागातील नागरिक पाण्याविना त्रस्त होते. त्यामुळे पाण्यासाठी आंदोलने सुरू झाली. या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेत पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जायस्वाल यांना शहरात पाठविले. त्यानंतर प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेत शहरात येणाऱ्या पाण्यात वाढ केली आहे.

सर्वांना समान पाणी देण्यासाठी नवे वेळापत्रक तयार करून पाच दिवसांआड म्हणजेच सहाव्या दिवाशी पाणी दिले जात आहे. एकीकडे थेंब थेंब पाण्यासाठी नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे बेकायदा नळाद्वारे लाखो लिटर पाण्याची चोरी होत आहे. त्यामुळे बेकायदा नळ कनेक्शन तोडण्यासाठी मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. ज्या भागात पाणीटंचाईची तीव्रता जास्त आहे, तिथे बेकायदा नळ तोडण्याची कारवाई केली जात आहे.

भावसिंगपुरा भागात पथकाने सर्वेक्षण केले असता, एकाच पाइपलाइनवर हजारो बेकायदा नळ कनेक्शन आढळून आले. त्यानुसार मंगळवारपासून बेकायदा नळांच्या विरोधात पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली आहे. दिवसभरात जेसीबीच्या माध्यमातून १६४ नळ तोडण्यात आल्याचे श्री. वाहुळे यांनी सांगितले.

पाइपलाइन भोवती क्रॉंक्रिटीकरण

ज्या ठिकाणी नळ तोडण्यात आले आहेत. त्याठिकाणाहून पुन्हा बेकायदा नळ जोडणी होऊ नये, यासाठी पाइपलाइनच्या भागात सिमेंट क्रॉंक्रिट टाकले जात असल्याचे श्री. वाहुळे यांनी सांगितले.बेकायदा नळ नियमित करून देण्यासाठी महापालिकेने अनेकवेळा मोहीम राबविली. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान बेकायदा नळ तोडल्यानंतर ज्यांना नियमित नळ घ्यायचे आहेत, त्यांना नळ नियमित करून दिले जातील, असे श्री. वाहुळे यांनी सांगितले.

पाइपलाइन भोवती क्रॉंक्रिटीकरण

ज्या ठिकाणी नळ तोडण्यात आले आहेत. त्याठिकाणाहून पुन्हा बेकायदा नळ जोडणी होऊ नये, यासाठी पाइपलाइनच्या भागात सिमेंट क्रॉंक्रिट टाकले जात असल्याचे श्री. वाहुळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT