Aurangabad water supply Problem Stormy winds Jayakwadi power off sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : पाणीपुरवठ्यावर 'वादळी वाऱ्याचे' विघ्न

जायकवाडीची दीड तास वीज बंद; पुन्हा वेळापत्रक कोलमडले

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : फारोळा येथील जल शुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्याचा प्रकार ताजा असतानाच शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्याने महापालिकेला फटका दिला. जायकवाडी व ढोरकीन येथील पंपहाऊसचा वीज पुरवठा दीड तास बंद करण्यात आल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. शनिवारी काही भागात कमी दाबाने तर काही भागात उशिराने पाणी पुरवठा करण्यात आला.

शहराच्या पाणी पुरवठ्यावर वारंवार विघ्न येत आहे. कधी पाइपलाइन फुटून तर कधी तांत्रिक अडचणीमुळे पाणी पुरवठा विस्कळित होत आहे. एकीकडे शहरात पाण्याची मागणी वाढली असताना दुसरीकडे वारंवार येणाऱ्या अडचणीमुळे महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग हतबल झाला आहे. फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या पॅनलमध्ये बिघाड झाल्याने शुक्रवारचा पाणी पुरवठा विस्कळित झाला होता. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पहाटे तीन वाजेपर्यंत जागून दुरुस्ती केली. त्यानंतर शहरातील पुरवठा सुरळीत होत नाही तोच शुक्रवारी वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीने दीड तास पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा बंद केला.

याविषयी पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी असलेले निवृत्त कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले की, वादळी वाऱ्यामुळे जायकवाडी येथील पंपगृहाचा वीज पुरवठा रात्री ११.४५ वाजता बंद केला. तो मध्यरात्री १.१५ ला सुरू करण्यात आला. याच वेळेत ढोरकीनचा देखील वीज पुरवठा बंद झाला होता. दीड तास पाणी उपसा बंद राहिल्यामुळे शहरात पाणी येण्यास पुन्हा विलंब झाला. मध्यरात्री १२.३० वाजता सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीचा वीज पुरवठा २० मिनिटे बंद होता. त्यामुळे काही भागात पुरवठा विस्कळित झाला. अनेक भागात कमी दाबाने तर काही ठिकणी उशिराने पाणी मिळाले. पाणी पुरवठा विभागाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. कोल्हे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT