चौघांचा तरुणावर धारदार वस्तूने हल्ला
छत्रपती संभाजीनगर ः हॉटेलच्या भागीदारीतून बाहेर पडताना गुंतवणुकीचे १८ लाख रुपये परत मागितल्याने वाद झाला. त्यात चौघांनी एका तरुणावर धारदार वस्तूने हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता.२८) रात्री सिडको कॅनॉट प्लेस परिसरात घडली. प्रशांत राठोड, प्रथमेश, सागर, शिवराज ईधाटे अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
दिनेश संजयसिंग जाधव (वय २३, रा. गारखेडा परिसर) यांनी तक्रार दिली. त्यानुसार, दिनेश आणि प्रशांत राठोड यांनी दीड महिन्यापूर्वी कॅनॉट प्लेस येथे हॉटेल लकाशा सुरू केले. दोघांनीही व्यवसायात गुंतवणूक केली होती. मात्र, प्रशांतने भागीदारीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत १८ लाख रुपये परत मागितले. यातून दोघांत वाद झाला. दिनेश बुधवारी हॉटेलमध्ये मोबाइलचा चार्जर घेण्यासाठी गेला. चार्जर घेऊन बाहेर आल्यानंतर तो दुचाकीजवळ पोचला असता प्रशांतने त्याच्याकडे भागीदारीचे पैसे परत मागितले. त्यानंतर प्रशांतने हातातील धारदार वस्तूने दिनेशच्या नाकावर वार केला. यात त्याचे नाक फ्रॅक्चर झाले. प्रथमेश, सागर आणि शिवराज ईधाटे यांनीही दिनेशला मारहाण केली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.