IND vs NZ, 5th T20I: शेवटचा सामन्यात होणार मोठे प्रयोग? वैभव सूर्यवंशी, कुलदीपला मिळणार Playing XI मध्ये संधी?

India's Predicted Playing XI vs New Zealand for 5th T20I: भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे आता रविवारी होणाऱ्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे.
Vaibhav Sooryavanshi | Kuldeep Yadav | India vs New Zealand T20I

Vaibhav Sooryavanshi | Kuldeep Yadav | India vs New Zealand T20I

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 5th Test: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी२० मालिका सुरू असून अखेरचा आणि पाचवा सामना रविवारी (१ नोव्हेंबर) हेमिल्टनला खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिले तीन सामने भारताने जिंकले असल्याने आधीच मालिका विजय निश्चित केला आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्याच्या निकालाचा मालिकेच्या निकालावर परिणाम होणार नाही.

पण असे असले तरी भारतीय संघाला आता बेंचवर बसलेल्या खेळाडूंना खेळवून अजमावण्याची संधी आहे. या मालिकेत पहिल्या तीन पराभवानंतर न्यूझीलंडने चौथा सामना ८७ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून चांगले पुनरागमन केले होते. त्यामुळे त्यांचाही प्रयत्न मालिका गमावली असली, तरी शेवटचा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचा असेल.

Vaibhav Sooryavanshi | Kuldeep Yadav | India vs New Zealand T20I
IND vs NZ ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का! प्रसिद्ध कृष्णा OUT, कोणत्या खेळाडूला मिळाली संधी?
Loading content, please wait...