file photo 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद जिल्ह्यात संभाव्य टंचाईग्रस्त गावाची संख्या सहाशेवर 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या निवारणाची भिस्त टंचाइ निवारण कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून राहणार आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई भासू शकेल अशी ५६१ गावे आणि ५४ वाड्यांची संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी जानेवारी ते जुन २०२० साठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला गेला. 

यंदा ऑक्‍टोबर महिन्यात अवकाळी व अतिवृष्टीच्या स्वरूपात आलेल्या पावसामुळे पाणीटंचाईचे संकट राहणार नाही असे वाटले. मात्र झालेला हा पाउस सर्वदूर समान नसल्याने जिल्ह्यातील अनेक पाणीसाठ्यांची व भूगर्भाची तहान कायम राहिली. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील एकूण ६५ मंडळांपैकी जवळपास २० ते २२ मंडळात गेल्या पाच वर्षात व यंदाही सरासरीइतका पाउस झाला नाही.

त्यामुळे जिल्ह्याचा सरासरी पाउस अपेक्षेच्या पुढे गेल्याचा दिसत असला तरी प्रत्यक्षात काही भागात यंदा पाणीटंचाईला सामोर जावे लागण्याची शक्‍यता व्यक्त केली जात होती. ही शक्यता गृहित धरून जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई भासू शकणाऱ्या ५६१ गावे व ५४ वाड्यांची संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी जानेवारी ते जुन २०२० साठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला गेला. जानेवारी ते मार्च व एप्रील ते जुन २०२० अशा दोन टप्प्यात या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे नियोजन केले.

 पहिल्या टप्प्यात ३१८ गावे व ४४ वाड्यांसाठी ६५२ योजनांसाठी अंदाजे आवश्‍यक खर्च १६ कोटी ९९ लाख प्रस्तावित करण्यात आला. तर दुसऱ्या टप्प्यात २४३ गावे व दहा वाड्यांच्या टंचाईच्या उपाययोजनांसाठी ४६० योजनांच्या पुर्ततेसाठी ११ कोटी ८३ लाख रूपये खर्च अपेक्षीत असल्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. दोनही टप्पे मिळून जानेवारी ते जुन २०२० दरम्यान जिल्ह्यातील ५६१ गावे व ५४ संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठीच्या प्रस्तावित योजनांसाठी २८ कोटी ८२ लाख ८५ हजार रूपयांचा खर्च अपेक्षीत असल्याचे सुत्रांनी सांगीतले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : सुरक्षेच्या कारणास्तव नवी दिल्ली मेट्रो बंद; प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT