file photo
file photo 
छत्रपती संभाजीनगर

जिल्हा परिषदेच्या शाळांत लवकरच गुणवंत विद्यार्थी अभियान

मधुकर कांबळे

औरंगाबाद - जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर उंचावण्यासाठी शिक्षण समितीच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षांत गुणवंत विद्यार्थी अभियान राबविण्यात येणार आहे. याची सर्वस्व जवाबदारी संबंधीत शाळेतील मुख्यद्यापक, शिक्षकांची राहणार आहे. 

जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी सांगीतले, जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्या वाढविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम व योजना राबविण्यात येतात. परंतू प्रत्यक्षात शाळेत शिक्षक अंमलात आणत नाही. शिक्षकांचे वेतन पाहता विद्यार्थ्यांची गुणवत्ता दिसुन येत नाही. 

जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पायाभुत शिक्षण न मिळाल्याने व तसे शिक्षकांकडुन प्रयत्न न झाल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेने कमी आहे. हा फरक बदलण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण समितीच्यावतीने गुणवंत विद्यार्थी अभियान राबविण्यात येणार आहे.

यात संबंधीत मुख्याध्यापक, शिक्षकांकडुन संबंधीत शाळेतील 'ढ' विद्यार्थ्यांची यादी मागवण्यात येणार आहे. यासाठी सर्व शिक्षक संघटना, संस्था व शिक्षण तज्ञ यांची लकरच एक बैठक बोलविण्यात येणार असल्याचे सभापती श्री. बलांडे यांनी सांगितले.

वेतन थांबवणार

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांकडुन 'ढ' विद्यार्थ्यांची यादी तयार करुन त्याचा आहवाल हा दर महिन्याला शिक्षण समितीकडे मागवला जाईल. 

दरम्यान तीन महिन्यानंतर अशा विद्यार्थ्यांवर विशेष उपक्रमातंर्गत गुणवत्ता वाढविण्याचे कार्य करण्यात यावे. या कालावधीनंतर संबंधीत शाळेत 'ढ' विद्यार्थ्यांची संख्या आढळल्यास संबंधीत मुख्याध्यापक , शिक्षकांचे वेतन थांबविण्यात येणार असल्याचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT