छत्रपती संभाजीनगर

संपाला पाठींबा मात्र प्रत्यक्ष सहभाग नाही..वाचा कुठे 

मधुकर कांबळे

औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटनांचा संपाला लेखा कर्मचारी संघटनेचा पाठिंबा दिला मात्र प्रत्यक्ष सहभाग सहभाग घेतला नाही. त्यामुळे कामकाजावर कसलाही परिणाम झालेला नाही. 

शासकीय , निमशासकीय कर्मचारी, कामगारांनी एक दिवसाचा बुधवारी (ता. आठ) लाक्षणिक संप पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने या संपाला पाठिंबा दिला आहे. मात्र संपात प्रत्यक्ष सहभागी न होता येथील जिल्हा परिषदेतील लेखा कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लाऊन काम केले.

दरम्यान महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, आरोग्य सेवा समन्वय समिती आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन यांचा संपाला पाठिंबा आहे, मात्र प्रत्यक्ष सहभाग नाही, त्यामुळे कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही. 

औरंगबाद शहर जिल्ह्यात बॅंक कर्मचाऱ्यांचा सहभाग 

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात झालेल्या संपात एसबीआय सोडता सर्व बॅंकांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे शहरातील सर्व बॅंका व्यवहार बंद होते. सर्व बॅंकांत तर्फे सकाळी साडेदहा वाजता क्रांती चौकातील बॅंक ऑफ महाराष्ट्र समोर निदर्शने करण्यात आली त्यानंतर अकरा वाजता देशव्यापी संप आतील मोर्चात सहभाग नोंदवला.

हा मोर्चा क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयावर धडकला. संपात सहभागी बॅंकांनी ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून बॅंकांत समोर आज आज संप आहे असे लिहिलेले बोर्ड बॅंकांत समोर लावण्यात आलेले आहे. 

एसबीआय सोडता सर्व बॅंकांनी संपात सहभाग नोंदवला यामुळे बहुतांशी बॅंकांमध्ये कर्मचारीच नव्हते त्यामुळे बॅंकांनीही ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून आज संप असल्याचा बोर्ड लावला दरम्यान नियमित प्रमाणे होणारे व्यवहार आज ठप्प होते. 
ब्लॅक चेक क्‍लिअरन्स या सर्व बंद होते, तरऑनलाईन व्यवहार सुरू होते. त्यामुळे बॅंकांच्या माध्यमातून दिवसभरातून होणारी कोट्यावधी रुपयांचा व्यवहार आज ठप्प होता . 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT