dr mangesh gondavle.png 
छत्रपती संभाजीनगर

पूर्ण वेळ "डीएचओ" मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु : डॉ. गोंदावले 

दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) हे पद काही कारणास्तव रिक्त झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून डॉ. उल्हास गंडाळ यांच्याकडे डीएचओ या पदाचा तात्पुरता पदभार दिला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. 

सध्या बदली प्रक्रिया स्थगित असल्याने आत्ताच पूर्णवेळ नवीन डीएचओ रुजू होतील की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही. परंतु आरोग्य विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळावा यासाठी आमचा शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरु असतांना अश्या परिस्थितीमध्ये कुणाकडे पदभार द्यावा असा प्रश्न आम्हाला पडला होता. डॉ. गंडाळ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चांगले काम केले त्यामुळे त्यांच्याकडेच पदभार कायम ठेवला. मात्र आता लवकर पूर्णवेळ अधिकारी मिळतो कि नाही हे सांगता येणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी केला. कोरोनविषयी केलेल्या कामांची माहिती मिळत नसल्याने तसेच आवश्यक त्या उपाययोजना करण्यास डॉ. गंडाळ अयशस्वी ठरल्याने जिल्हा परिषदेतील पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ. मंगेश गोंदावले हे पदाधिकाऱ्यांची नाराजी पत्करून डॉ. गंडाळ यांच्याकडेच डीएचओ या पदाचा तात्पुरता पदभार ठेवून पाठराखण करणार ? कि अन्य अधिकाऱ्याकडे डीएचओची जवाबदारी देणार ? कि जिल्हा परिषदेला शासनाकडून पूर्णवेळ डीएचओ पद मिळविण्यात डॉ. मंगेश गोंदावले बाजी मारणार याची चर्चा मात्र जिल्हा परिषदेच्या वर्तुळात दबक्या आवाजात सुरूच राहणार असल्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT