aurangabag crime news 
छत्रपती संभाजीनगर

मटणाचे पैसे का मागितले म्हणत दुकानदाराला केली जबर मारहाण

सुषेन जाधव

औरंगाबाद: मटण घेण्यास गेल्यानंतर आधी घेतलेल्या मटणाचे पैसे दे म्हणताच मटण दुकानदाराला शिवीगाळ करुन जबर मारहाण करण्यात आली. ही घटना ३० मार्च रोजी बारुदनगर नाला, औरंगपूरा येथे घडली. या प्रकरणी अरबार खान फिरोज खान (२५), फरान खान फिरोज खान (२५), फिरोज खान (४५, रा. सर्व बारुदगरनाला) या तिघांविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी फैजान अहमेद कुरेशी (२२, रा. शहाबाजार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फैजान यांचे मटण दुकान आहे. दरम्यान संशयित अरबाज हा त्याच्या मित्रासोबत फैजान यांच्या दुकानात गेला, आणि मटण मागितले असता, फैजान यांनी याआधी मटण घेऊन गेला त्याचे पैसे दिले नाही असे म्हणताच अरबाज याने दुकानदार फैजान यांना अश्‍लिल शिवीगाळ केली, काही वेळाने फरान आणि फिरोज खान या दोघांना बोलावून शिवीगाळ करत दांड्याने, फायटरने फैजान यांना जबर मारहाण केली. यात फैजान यांचे रक्त गोठले. दरम्यान फिर्यादीवरुन वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Transaction Charges: 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के टॅक्स; 'या' ग्राहकांसाठी मात्र UPI सेवा मोफत

''तर तोंड काळं करायची वेळी आली असती'', राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेला CM फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर...

IND vs AFG 2nd T20I: 'Toss' चा 'BOSS'! श्रेयस अय्यरने नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; वरूण चक्रवर्तीला नेमकं काय झालं? BCCI म्हणते...

Pune News : पुण्याच्या चारीही दिशांना स्वतंत्र डंबर प्लांट उभारा; महापौर नागपुरे यांचे आयुक्तांना पत्र

Hingoli News : चोंडीत शक्तिपीठ महामार्गाची मोजणी रोखली! ‘जमीन गेली तर जगायचे कसे?’ वृद्ध महिला शेतकऱ्यांचा आक्रोश; तुषार जाधव यांचा पालकमंत्र्यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT