lockdown in Aurangabad. 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabd Lockdown: आज औरंगाबादमध्ये कडकडीत बंद; जाणून घ्या शहरात काय सुरू आणि बंद

मधुकर कांबळे

औरंगाबाद: शहर व जिल्ह्यात ११ मार्चच्या मध्यरात्रीपासून ४ एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन राहणार आहे. तर दर शनिवारी आणि रविवारी पूर्णपणे कडकडीत बंद राहणार आहे. शनिवार (ता.१३ ) पासून दोन दिवस शहर व जिल्ह्यत कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. त्यामुळे आज शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असून लॉकडाऊनचे पालन होताना दिसत आहे.

ता. ४ एप्रिलपर्यंत आठवड्यातील पाच दिवस अंशत: लॉकडाऊन करण्याचा तर दर शनिवार व रविवारी पूर्णपणे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन दिवसांत जीवनावश्‍यक घटक वगळता कडकडीत बंद राहणार आहे. सर्व खासगी आस्थापनांनी त्यांच्याकडे कामाला असणाऱ्या कर्मचारी, कामगारांची दर १५ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करून तसे प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हे बंद असणार आहे- 
० आठवडी बाजार, बाजारपेठा, जलतरण तलाव. 
० शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, पर्यटनस्थळे 
० सभागृहे, मंगल कार्यालये व लॉन्स 
० सामाजिक, धार्मिक, राजकिय, सांस्कृतिक कार्यक्रम 
० कुठलेही मोर्चे, धरणे, निदर्शने, मिरवणुका 
० जाधववाडी येथील मंडई बंद, पर्यटनस्थळे बंद 
० डीमार्ट, बीग बाझार, रिलायन्स माल चित्रपटगृहे, नाट्यगृहे. 
० हॉटेल्स आणि रेस्टारंट प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील 
०होम डिलव्हरी व स्वयंपाकगृह रात्री ११.०० पर्यंत सुरु 

हे सुरू असणार आहे- 
० वैद्यकीय सेवा व मेडीकल दुकाने 
० वर्तमानपत्र व संबंधित सेवा 
० किराणा दुकान, पशुखाद्य दुकाने 
० दूध विक्री, फळे व भाजीपाला 
० पेट्रोल पंप, उद्योग, कारखाने सुरू 
० चिकन, मटन, अंडी विक्री सुरू 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

'मुंबई फक्त परप्रातियांमुळे, नाहीतर मराठी लोकांची परिस्थिती बिकट' प्रसिद्ध अभिनेत्रीच वादग्रस्त वक्तव्य, ट्रोल होताच मागितली माफी

उत्तर भारतात पुन्हा विमान अपघाताची शक्यता? ज्योतिषाचार्यांनी शेअर मार्केटचं ही वर्तवलं भविष्य

Latest Maharashtra News Updates : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा २० मिनिटे ठप्प, प्रवाशांचा संताप

M S Dhoni Video : मोजक्या मित्रांसह धोनीने साजरा केला ४४वा वाढदिवस, माहीच्या बर्थडे सेलिब्रेशनचा खास व्हिडीओ पाहाच..

SCROLL FOR NEXT