shahrnama.jpg
shahrnama.jpg 
छत्रपती संभाजीनगर

रक्ताचे नाते दुरावले; पण इरफानभाई-साबीरभाई मदतीला धावले ! 

दुर्गादास रणनवरे

‘‘शहरातील एखाद्या कोरोनाबधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास बरेचदा त्यांचे रक्ताचे नातेवाईकदेखील मृतदेह ताब्यात घेण्यास आणि त्यावर अंत्यविधी अथवा दफन करण्यास नकार देतात. काही नातेवाईक तर मृतदेहाच्या जवळही फिरकत नाहीत; परंतु कोरोनाची कसलीही भीती न बाळगता येथील एका सेवाभावी संस्थेचे मसीहा शेख इरफानभाई आणि मोहंमद साबीरभाई हे मात्र तब्बल ४० सहकाऱ्यांसोबत २४ तास कसलाही मोबदला न घेता कोरोनाग्रस्त रुग्णांचे दफनविधी करण्याचे पवित्र कार्य पार पाडत आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून इरफानभाई आणि साबीरभाई हे कोरोनाबाधित मृतांवर दफनविधी करून एकप्रकारे देशसेवाच करीत आहेत. आपल्या जवळपासच्या एखाद्या जिवंत व्यक्तीला कोरोना झाल्याचे कळले तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र, ‘भाईं’ची टीम कोरोनाची कसलीही भीती न बाळगता हे महान कार्य चार महिन्यांपासून करीत आहे.’’ 

घाटीसह मिनी घाटी, कमलनयन बजाज रुग्णालय, सिटी केअर हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल, एमजीएम हॉस्पिटल आदी रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान एखाद्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास दफनविधीसाठी मृतदेह घेऊन जाण्यासाठी इरफानभाई आणि साबीरभाई यांना फोन करून पाचारण करण्यात येते. लगेच त्यांची टीम मृतदेह घेऊन जाते व दफनविधीचे सोपस्कार अगदी नातेवाइकांप्रमाणेच कसलीही उणीव बाकी न ठेवता पार पाडतात. 

तब्बल ४० जणांची टीम दफनविधीसाठी सदैव तत्पर 
 
रुग्णांच्या नातेवाइकांची तसेच रुग्णालयाची गैरसोय होऊ नये यासाठी इरफानभाई आणि साबीरभाई यांनी प्रत्येकी आठ सहकाऱ्यांची एक अशा एकूण पाच स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. कोणत्याही वेळेत कोणत्याही रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी फोन आला तरी ही टीम लगेच तिथे धाव घेते व मृतदेह कब्रस्तानात घेऊन जाते. 

बाहेरगावच्या मृतदेहांचे बायजीपुरा, चिताखाना कब्रस्तानात होते दफन 

शहरातील एखाद्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला तर शहरातील त्यांच्या नातेवाइकांच्या प्रथेनुसार किंवा नातेवाइकांच्या सोयीच्या ठिकाणी असलेल्या कब्रस्तानामध्ये दफनविधी केला जातो. बाहेरगावच्या मृताचा दफनविधी बायजीपुरा येथील व महापालिका परिसरातील चिताखाना कब्रस्तानामध्ये पार पाडला जातो. थोडेथोडके नव्हे, तर ४ ऑगस्टपर्यंत इरफानभाई आणि साबीरभाई यांच्या टीमने १४४ कोरोनाबधित मृतांवर दफनविधी केले आहेत. यासाठी संस्थेच्या टीमला महापालिकेतर्फे पीपीई किट, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी साहित्य मोफत मिळते. तर घाटी रुग्णालयातून १०८ नंबरवरून रुग्णवाहिका मागविली जाते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT