औरंगाबाद : औरंगाबादेतील नेहमी गजबजणाऱ्या सिद्धार्थ गार्डनमध्ये अशी तुरळक गर्दी पहायला मिळत आहे.  
छत्रपती संभाजीनगर

सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालय सुनेसुने 

मधुकर कांबळे

औरंगाबाद - शहरवासीयांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे. याचा महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयावरही परिणाम झाला आहे. एरवी याठिकाणी दिवसाकाठी भेट देणाऱ्या सुमारे ४,५०० लोकांची संख्या कमी होऊन १,५०० पर्यंत आली आहे. सदैव गजबजलेल्या उद्यानात आणि प्राणिसंग्रहालयात शुकशुकाट दिसत आहे. 

शहरातील सर्वांत मोठे उद्यान सिद्धार्थ गार्डन मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असल्याने शहरातील लोकांसह परगावाहून या गार्डनमध्ये जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय याच ठिकाणी असल्याने जिल्ह्यासह मराठवाड्यातून अनेकजण, शाळांच्या सहली येथे येतात. सिद्धार्थ गार्डन आणि प्राणिसंग्रहालयाला एरवी भेट देणाऱ्यांची संख्या रोज सुमारे चार ते ४,५०० असते. यामध्ये बालगोपाळांची संख्या लक्षणीय असते.

काही दिवसांपासून कोरोनाच्या संशयितांची संख्या वाढत जात असल्याने याचा परिणाम गार्डन व प्राणिसंग्रहालयात येणाऱ्यांच्या संख्येवर झाला आहे. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून संख्या रोडावत आहे. कोरोनाच्या परिणामामुळे आता रोज १,५०० च्या आसपास लोक भेटी देत आहेत. प्राणिसंग्रहालयाकडे जाणारेही कमी झाले आहेत. 

सुट्या असूनही पाठ 

गार्डनसाठी मोठ्यांना २० तर लहानांसाठी १० रुपये तर प्राणिसंग्रहालयासाठी मोठ्यांसाठी ५० तर लहानांसाठी २० रुपये प्रवेश शुल्क आहे. कोरोनामुळे सिद्धार्थ गार्डनच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. पूर्वी रोज ४० ते ४५ हजार नुसत्या गार्डनच्या प्रवेश शुल्कातून उत्पन्न व्हायचे ते आता २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत आले आहे. सुट्या असूनही लोक येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

कोरोनाची खबरदारी : ८५० घरांचे सर्वेक्षण

औरंगाबाद शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नऊ पथकांनी ८५० घरांचे सर्वेक्षण केले. यात पाचजणांना सर्दी, ताप, खोकला असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. शहरातील ५९ वर्षीय महिलेच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. तिच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. औरंगाबादेतील हा पहिलाच कोरोनाबाधित रुग्ण आहे. ही माहिती समोर येताच शहरात सर्वत्र ॲलर्ट जारी करण्यात आला.  

शहरातील कोरोनाबाधित महिला रुग्णाचे सर्व निकटवर्तीय व नातेवाइकांशी संपर्क साधून प्राथमिक चौकशी व तपासणी करण्यात आली; मात्र त्यातील कोणालाही कोरोना आजाराबाबतची लक्षणे आढळून आलेली नाहीत. ८५० घरांच्या सर्वेक्षणात पाचजणांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आढळून आली. ते सर्वजण खासगी डॉक्टरांकडून उपचार घेत असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today : पेट्रोल- डिझेलचे दर आज पुन्हा बदलले, तुमच्या शहरात काय आहे ताजा दर? जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई-पुणे फक्त दीड तासात, तर मुंबई-पुणे-बंगळुरू साडे पाच तासात; गडकरींनी सांगितला मास्टरप्लॅन

IND vs SA 3rd T20I : गिल, सूर्यकुमारच्या फॉर्मकडे लक्ष; भारत-आफ्रिका यांच्यामध्ये आज तिसरा टी-२० सामना, कशी असेल Playing XI?

Kolhapur IT Park : अखेर कोल्हापूरला ‘आयटी पार्क’चा मार्ग मोकळा! जागा हस्तांतर निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब

Pune Cold Wave: पुणे परिसरात थंडीचा कडाका कायम; पाषाणात किमान तापमान ८.३ अंशांवर

SCROLL FOR NEXT