छत्रपती संभाजीनगर

नीरज गोयल : सकाळ संवाद दिवाळी अंक

CD
ऑटोमोटिव्ह, लॉजिस्टिकला येणार ‘अच्छे दिन’ नीरज गोयल : पायाभूत सुविधांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज ----- इंट्रो एलएपीएल ऑटोमोटिव्हचे संस्थापक अध्यक्ष नीरज गोयल यांनी पदवीनंतर साधारण ३६ वर्षांपूर्वी दिल्लीतील एका कंपनीत काम करण्यास सुरवात केली. त्यानंतर फेब्रुवारी १९९७ मध्ये शहरात दाखल होत नामांकित कंपनीला लॅम्प्स् (लाइट) पुरविण्याचा उद्योग सुरू केला. २००३ मध्ये कंपनीचा पुरवठा बंद करावा लागला. त्यानंतर नव्या दमाने व्यवसायाला सुरवात केली. ग्राहकाला आवश्यक असलेले उत्पादन उपलब्ध करून देण्यावर आपण नेहमीच भर दिला. ग्राहकाची समस्या समजून घेऊन त्यावर उपाय देण्याची पद्धत स्वीकारल्याने व्यवसायात विश्वास निर्माण झाला, असेही गोयल सांगतात. ----- छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या एलएपीएल ऑटोमोटिव्हचे संस्थापक अध्यक्ष नीरज गोयल यांनी अनेक अडचणींवर मात करत उद्योगाचा विस्तार केला. ग्राहकांच्या गरजा समजून घेणे, गुणवत्तेला प्राधान्य देणे आणि अपयशातून शिकत पुढे जाणे, ही त्यांच्या यशाची सूत्रे आहेत. बदलत्या काळात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत असून, तरुणांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकसित करून उद्योग-व्यवसायात उतरावे, असा त्यांचा संदेश आहे. उद्योगवाढीसाठी सक्षम पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि कुशल मनुष्यबळ आवश्यक असल्याचेही ते अधोरेखित करतात. ----- छत्रपती संभाजीनगर : एखाद्या कामाबद्दल आधीच अपयशाची भीती बाळगण्यापेक्षा ते काम करून पाहणे महत्त्वाचे आहे. ‘आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा यश मिळतेच’, असा विश्वास एलएपीएल ऑटोमोटिव्ह लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ उद्योजक नीरज गोयल यांनी व्यक्त केला. ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव, व्यवसायातील आव्हाने, उत्पादनातील विविधता, शासनाच्या औद्योगिक धोरणांबाबतच्या अपेक्षा आणि तरुणांसाठीचा संदेश आदी विषयांवर त्यांनी संवाद साधला. गोयल यांनी पदवीनंतर साधारण ३६ वर्षांपूर्वी दिल्लीतील एका कंपनीत काम करण्यास सुरवात केली. सुरवातीला विविध जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना उत्पादन, पुरवठा, ग्राहकांच्या गरजा आणि कंपनी व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. दरम्यान, फेब्रुवारी १९९७ मध्ये शहरात दाखल होत त्यांनी येथील नामांकित कंपनीसाठी तसेच दिल्लीतील एका कंपनीला लॅम्प्स् (लाइट) पुरविण्याचा उद्योग सुरू केला. अत्यल्प कालावधीत इमारत, कर्ज, यंत्रसामग्री, अनुदान आणि विक्रेता कोडची प्रक्रिया पूर्ण करून अनेक वर्षे त्यांनी या उत्पादनांचा पुरवठा केला. व्यवसायाच्या सुरवातीच्या काळात गोयल यांना कंपनीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पूर्वीच्या कंपनीचे २००० मध्ये शहरातील कंपनीचा पुरवठा करणे बंद झाले. त्यापाठोपाठ २००३ मध्ये शहरातील कंपनीचा पुरवठा बंद करावा लागला. अनुदानाशी संबंधित आर्थिक जबाबदारीही होती. मात्र, ही युनिट बंद न करता नव्या नव्या दमाने व्यवसायाला नव्याने सुरवात केली. इतर कंपन्यांच्या वाहनांसाठी टेल लॅम्प आणि फ्रंट लॅम्प तयार करण्याची संधी मिळाल्यानंतर माझ्या कंपनीने पुन्हा उभारी घेतल्याचे गोयल सांगतात. ‘ग्राहकांच्या अडचणी सोडविणे हा आपल्या व्यवसायाचा प्रमुख सिद्धांत राहिलेला आहे. ग्राहकाला आवश्यक असलेले उत्पादन उपलब्ध करून देण्यावर आपण नेहमीच भर दिला. किंमत ठरविण्यापूर्वी ग्राहकाची समस्या समजून घेऊन त्यावर उपाय देण्याची पद्धत स्वीकारल्याने व्यवसायात विश्वास निर्माण झाल्याचे ते म्हणतात. ----- पायाभूत सुविधा, अनुदानाची गरज औद्योगिकदृष्ट्या दिवसेंदिवस वाढ होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी, डीएमआयसी आदी औद्योगिक परिसरातील समृद्धी महामार्गामुळे वाहतूक आणि लॉजिस्टिक्सला या दोन्ही सेक्टरला चालना मिळत आहे. आगामी काळात येथे औद्योगिक विकासाचा वेग वाढेल, परंतु त्यासाठी अंतर्गत रस्त्यांची देखभाल, सार्वजनिक वाहतूक आणि कामगारांना कारखान्यांपर्यंत सहज पोचण्याची सुविधा देण्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज गोयल यांनी व्यक्त केली. ----- ‘शिक्षण घ्या, पण आवडीच्या क्षेत्रात काम करा’ तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे. मूलभूत शिक्षण आणि ज्ञान अत्यंत आवश्यक आहे; मात्र शिक्षणाचा उपयोग प्रत्यक्ष कौशल्य विकासासाठी व्हायला हवा, असे गोयल म्हणाले. ‘व्यवसायात नैतिकता, ग्राहकांना मदत करण्याची वृत्ती आणि टीमवर विश्वास असेल तर प्रगती निश्चित होते’, असेही ते म्हणाले. ----- इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मोठ्या संधी इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापरामुळे मोटर्स, मिरर, लायटिंग आणि इतर घटकांच्या उत्पादनाला मोठी संधी उपलब्ध होत आहे. पारंपरिक इंजिनवर आधारित वाहनांमधील काही उत्पादनांची मागणी पुढील काही वर्षे कायम राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक घटकांचे स्थानिक उत्पादन वाढविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. कंपनीच्या विस्तारासाठी नवीन युनिट उभारण्यात येत असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे. कंपनीच्या सार्वजनिक समभाग विक्रीतून मिळणाऱ्या निधीचा उपयोग नवीन उत्पादन युनिटसाठी भांडवली खर्च, काही कर्जांची परतफेड आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी केला जाणार असल्याचे गोयल यांनी सांगितले. कंपनीशी प्रत्यक्षरीत्या २०० हून अधिक कर्मचारी व कंत्राटी मनुष्यबळ जोडलेले आहेत. कंपनीच्या पुरवठा साखळीशी पाचशेहून अधिक विक्रेते जोडलेले आहेत. ----- लाइटिंगपासून मोटर्स, मिरर, सॉफ्ट कॅनोपीपर्यंत विस्तार गोयल यांची ‘एलएपीएल’ ऑटोमोटिव्ह लिमिटेड सध्या कंपनी लाइटिंग, छोट्या मोटर्स, मिरर आणि सॉफ्ट कॅनोपी आदी उत्पादने तयार करते. वाहनांसाठीचे दिवे, इंडिकेटर्स, स्टार्टर मोटर्स, आर्मेचर, रोटर-स्टेटर, वायपर मोटर्स, डीसी फॅन्स तसेच वाहनांच्या मिररमधील मोटर यांसारख्या विविध उत्पादनांची निर्मिती ते करतात. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक सॉफ्ट कॅनोपी आणि स्टिचिंग उत्पादनेही तयार केली जात आहेत. सध्या पारंपरिक लेन्स डिझाइनऐवजी रिफ्लेक्टरवर मल्टिफोकल रिफ्लेक्शन डिझाइन विकसित केले असून या यशामुळे ‘एलएपीएल’ला ‘डिझाइनसह लॅम्प विकसित करू शकणारी कंपनी’ अशी बाजारातील ओळख मिळाल्याचे गोयल यांनी आवर्जून सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

Drought Crisis: टंचाईच्या स्थितीतून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न ;शरद पवार यांचा दौरा सुरु

IND vs NZ ODI: टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया पुन्हा सज्ज! पहिला वनडे सामना कधी, कुठे अन् किती वाजता? लाईव्ह सामना टीव्ही मोबाईलवर कुठे पाहता येणार?

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची जाणार, तुरुंगवारीही ठरलेली! रामलीला मैदानातून राहुल गांधींचा थेट इशारा...

SCROLL FOR NEXT