छत्रपती संभाजीनगर

बजाज ऑटोच्या विक्रीत १४ टक्क्यांची वाढ

CD
बजाज ऑटोच्या विक्रीत १४ टक्क्यांची वाढ ऑक्टोबरमध्ये ५.९१ लाख वाहनांची विक्री, येत्या काळात उत्पादन क्षमता वाढविणार सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. ४ : बजाज ऑटोच्या वाहन विक्रीत ऑक्टोबर २०२६ मध्ये गतवर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने महिनाभरात दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांची मिळून पाच लाख ९१ हजार ८७६ वाहनांची विक्री केली. ऑक्टोबर २०२५ मध्ये ही विक्री पाच लाख १८ हजार १७० होती. दरम्यान, कंपनी सध्या दरमहा ६ लाख २५ हजार वाहनांची असलेली एकूण उत्पादन क्षमता पुढील सहा ते नऊ महिन्यांत टप्प्याटप्प्याने वाढवून दरमहा सुमारे ७ लाख ७५ हजार वाहनांपर्यंत नेण्यात येणार आहे. कंपनीने सोमवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये दुचाकींची एकूण विक्री पाच लाख एक हजार १९४ झाली. गतवर्षीच्या तुलनेत त्यात १३ टक्क्यांची वाढ झाली. देशांतर्गत बाजारात दोन लाख ९२ हजार ८८५ दुचाकींची विक्री झाली, तर दोन लाख आठ हजार ३०९ दुचाकींची निर्यात करण्यात आली. देशांतर्गत विक्रीत १० टक्के, तर निर्यातीत १८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत ऑक्टोबरमध्ये ९० हजार ६८२ व्यावसायिक वाहनांची विक्री झाली. ही वाढ २० टक्के आहे. देशांतर्गत बाजारात ५८ हजार २६३, तर निर्यातीत ३२ हजार ४१९ वाहनांची विक्री झाली. सात महिन्यांत निर्यातीत ४२ टक्के वाढ एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत बजाज ऑटोने एकूण ३५ लाख ७९ हजार १११ वाहनांची विक्री केली. मागील वर्षी याच कालावधीत २९ लाख २३ हजार ५२७ वाहनांची विक्री झाली होती. त्यामुळे एकूण विक्रीत २२ टक्क्यांची वाढ झाली. या कालावधीत दुचाकींची विक्री ३० लाख सात हजार ७०७ झाली असून, त्यात २२ टक्क्यांची वाढ आहे. व्यावसायिक वाहनांची विक्री पाच लाख ७१ हजार ३०४ झाली असून, ती २३ टक्क्यांनी वाढली. विशेष म्हणजे, सात महिन्यांत एकूण वाहन निर्यात १७ लाख ५१ हजार ४२९ वर पोचली. गतवर्षीच्या तुलनेत निर्यातीत ४२ टक्क्यांची वाढ झाली. देशांतर्गत विक्रीत मात्र आठ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. ---------- दरमहा दीड लाखाने वाढविणार उत्पादन क्षमता बजाज ऑटोने वाढती मागणी आणि इलेक्ट्रिक वाहने तसेच उच्च क्षमतेच्या मोटारसायकलींच्या उत्पादनावर येणारा ताण लक्षात घेता कंपनीने सध्याची दरमहा ६ लाख २५ हजार वाहनांची उत्पादन क्षमता पुढील सहा ते नऊ महिन्यांत वाढवून ७ लाख ७५ हजार वाहनांपर्यंत नेण्याचे नियोजन केले आहे. कंपनीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्मा यांनी गुंतवणूकदारांशी संवाद साधताना सोमवारी (ता. दोन) ही माहिती दिली. कंपनीचा वाळूज प्रकल्प दुचाकी, तीनचाकी आणि निर्यात वाहनांचा प्रमुख केंद्रबिंदू असून येथील स्थानिक एमएसएमई तसेच मोठ्या वेंडर कंपन्यांनाही याचा उद्योगवाढीसाठी लाभ होण्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

MSRTC strike Diwali: ऐन दिवाळीत 'एसटी'चा संप! कर्मचाऱ्यांनी दिली राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा! किनीतील आंदोलनामुळे कोगनोळीत ट्रकच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

कोणाकडे तरी आकर्षित होऊन... वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी का केलं दुसरं लग्न? आता सांगितलं कारण, म्हणाले-

SCROLL FOR NEXT