बकरी ईद sakal
छत्रपती संभाजीनगर

Bakari eid 2023 : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर छावणी बाजारात लाखोंची उलाढाल

बकऱ्याची किंमत दीड लाखापर्यंत!

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : बकरी ईद गुरुवारी (ता. २९) साजरी केली जाणार असून, त्यानिमित्त कुर्बानी देण्यासाठी गुरुवारच्या (ता. २२) छावणी बाजारात मोठी उलाढाल झाली. धष्टपुष्ट बकऱ्याची किंमत ६० हजारांपासून ते दीड लाखापर्यंत होती.

बकरी ईदची आतापासून तयारी सुरू आहे. कुर्बानीच्या जनावरांची खरेदी-विक्री केली जात आहे. गुरुवारी छावणी बाजारात शेळ्या-बकऱ्यासह इतर जनावरे व्यापाऱ्यांनी आणली होती. बकरी ईदसाठी जनावरे खरेदी करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शहर परिसरातील अनेक गावातील नागरिक बकऱ्या विकण्यासाठी आले होते. त्यामुळे दिवसभरात सुमारे ४० लाखांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.

कन्नड, वैजापूर, गंगापूर, सिल्लोड तालुक्यातील नागरिक बकऱ्यांची विक्री करण्यासाठी बाजारात आले होते. काही व्यापारी तर काही शेतकरी होते. बकरी ईद डोळ्यासमोर ठेवून मुंबईतील काही व्यापारी बकऱ्यांची विक्री करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे येतात. मात्र यावेळी मुंबईहून शेळ्या आल्या नाहीत. मालेगावातील काही व्यापारी बकऱ्या विकण्यासाठी शहरात दाखल झाले.

काश्‍मिरी बकरेही विक्रीला

जमनापरी, बारबरी याशिवाय छावणीच्या बाजारात काश्मिरी बकरे विक्रीसाठी उपलब्ध होते. १०,००० ते ६०,००० रुपये किमतीच्या शेळ्या बाजारात आल्या. सुंदर बकऱ्यांची किंमत ६० हजारांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत होती. एका व्यापाऱ्याने बकऱ्यांच्या विक्रीसाठी खास व्यवस्था केली होती. येथे बोकडाची किंमत ३० हजार ते ८० हजारांपर्यंत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT