bamu 
छत्रपती संभाजीनगर

BAMU : ‘पेट’चा दुसरा टप्पा सुरु, १५ दिवस मुदतवाढ

विद्यापीठाच्या वतीने ‘पीएच.डी‘ एंट्रन्स टेस्ट (पेट पेपर पहिला व दुसरा) PET Exam जानेवारी व मार्चमध्ये घेण्यात आली. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ विषयांत ‘पेट‘ घेण्यात आली.

संदीप लांडगे

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने Bababasaheb Ambedkar Marathwada University (Bamu) ‘पेट’चा दुसरा टप्पा राबविण्यात आला आहे. 'पेट'मध्ये पात्र तसेच 'पेट'मधून सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी दिली. विद्यापीठाच्या वतीने ‘पीएच.डी‘ एंट्रन्स टेस्ट (पेट पेपर पहिला व दुसरा) PET Exam जानेवारी व मार्चमध्ये घेण्यात आली. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ विषयांत ‘पेट‘ घेण्यात आली. पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षेत चार हजार २९९ पात्र ठरले आहेत. पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम.फिल आदी) विद्यार्थ्यांची नोंदणी सात ते ३० जूनदरम्यान ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले Vice Chancellor Pramod Yeole यांनी १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तर २० जुलैपर्यंत विद्यापीठात ‘हार्ड कॉपी’ जमा करता येईल. या टप्प्यात ‘पेट‘ उत्तीर्ण झालेले तसेच ‘पेट‘मधून सूट मिळालेले दुसऱ्या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहेत. यामध्ये नेट, सेट, स्लेट, सीएसआयआर, जेआरएफ, गेट, जीपॅट, एफआयपी तसेच ‘सीईटी’मार्फत प्रवेश घेऊन पदवी प्राप्त एम.फिल विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. पीएचडीसाठी रिक्त असलेल्या जागा व संशोधक मार्गदर्शकांची यादी संकेतस्थळावर घोषित करण्यात आली आहे. पुढील महिन्यात संशोधन मान्यता समितीच्या (आरआरसी) बैठका घेण्यात येणार आहेत.bamu university's pet process starts aurangabad updates

सेवानिवृत्तीपर्यंत विद्यार्थी घेता येणार

विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात कार्यरत संशोधक, मार्गदर्शकांना सेवानिवृत्तीपर्यंत संशोधक विद्यार्थी यांना मार्गदर्शन करता येणार आहे. जे संशोधन मार्गदर्शक वयाचे ५७ वर्षे पूर्ण करीत होते त्यांच्या नावासमोर एकूण मंजूर जागा झिरो करण्यात आली होती. त्यात आता बदल करण्यात आला असून, जे संशोधन मार्गदर्शक १५ जुलैरोजी आपापल्या आस्थापनेवर कार्यरत आहेत, त्यांच्या नावासमोर त्यांच्या पदनिहाय मंजूर संख्या दर्शविण्यात येतील व त्यांना नवीन संशोधक संशोधनासाठी देण्यात येतील. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ.योगेश पाटील यांनी कळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT