ABD26J79134
(((फोटो कॅप्शन))) युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने शुक्रवारी झालेल्या निदर्शनात सहभागी बँक कर्मचारी.
---
पाच दिवसांच्या आठवड्यासाठी
बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने
---
येत्या २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा संप
----
छत्रपती संभाजीनगर, ता. ११ : बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, शिवाय कामगिरीशी निगडित प्रोत्साहनपर भत्ता (पीएलआय) बाबत सरकारने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, या प्रमुख मागण्यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने शुक्रवारी (ता. ११) निदर्शने करण्यात आली. यात ८०० हून अधिक बँक कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान, बँक कर्मचारी संघटनांनी २८, २९ आणि ३० सप्टेंबरला तीन दिवसांच्या संपाची हाक दिली आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास ऑक्टोबर महिन्यात बेमुदत संप करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. कामगिरीशी निगडित प्रोत्साहनपर भत्ता (पीएलआय) देण्याबाबत वाटाघाटी न करता सरकारने एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप संघटनांनी केला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अमरप्रीत चौकातील बँक ऑफ इंडियासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.
कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट फेडरेशनचे कैलास कानडे यांनी मार्गदर्शन केले. ललित निकुंभ, गणेश तायडे, अमोल गायके, दिगंबर हरकळ आणि नीलेश खरात यांनीही भाषणे केली. सचिन देशपांडे, प्रणव कौशिके, मारुती निकम, पीयूष बिऱ्हाडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्र देवळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.