Beating. Sakal
छत्रपती संभाजीनगर

Crime News: अहमदपूरमध्ये कीर्तनकाराला मारहाण

बारा जणांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

अहमदपूर : कीर्तनकार शिवानंद उद्धवराव हैबतपुरे (वय ४३) यांना दहा ते बारा जणांनी मारहाण करून जखमी केले आहे. ही घटना बुधवारी (ता.एक) महादेववाडी (ता. अहमदपूर) जवळ घडली. याप्रकरणी बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उदगीर येथील कीर्तनकार शिवानंद हैबतपुरे बुधवारी सकाळी अहमदपूर येथील भक्तिस्थळावर राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधी दर्शन व आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून दुपारी उदगीरकडे येत होते. दरम्यान, एका वाहनातून आलेल्या दहा ते बारा जणांनी शिवानंद हैबतपुरे यांना थांबण्यास सांगितले. यानंतर त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली; तसेच जवळील मोबाइल, एक लाख ३५ हजार रुपयांचे लॉकेट काढून घेतले. गाडीची काच फोडली.

याप्रकरणी कीर्तनकार हैबतपुरे यांच्या तक्रारीवरून महादेव धोंडे, शुभम घोडके, नागेश माचुंद्रे, हनुमंत लांडगे, सूर्यकांत आनेराव, कपिल भालके, गोविंद आनेराव, राजकुमार मालवाडे, विश्वंभर स्वामी, गुरुराज स्वामी व इतर अज्ञात दोन अशा बारा जणांवर अहमदपूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. पुढील तपास उपनिरीक्षक एकनाथ डक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT