छत्रपती संभाजीनगर

बीडला हाणामारी, गोळीबाराचा थरार; संपत्तीच्या विक्रीवरून वाद

मुद्रांक कार्यालयासमोर संपत्तीच्या विक्रीवरून वाद, दोघे जखमी

सकाळ वृत्तसेवा

बीड : जमीन (प्लॉट) विक्रीच्या वादातून दोन गटांतील शाब्दिक वादाचे पर्यवसान हाणामारीत व नंतर गोळीबार झाले. शुक्रवारी (ता.२५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील मुद्रांक कार्यालयाच्या आवारात हा थरार झाला. मारहाण-गोळीबारात दोघे जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश बबन क्षीरसागर (३०, लक्ष्मणनगर, बीड) व फारुख सिद्दिकी (२८, जालना रोड, बीड) अशी जखमींची नावे आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचार करून नंतर त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले. उशिरापर्यंत गुन्हा नोंद झालेला नव्हता.

सहा भूखंडाच्या खरेदी - विक्रीच्या व्यवहारासाठी आज सकाळी अकराच्या सुमारास येथील सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात काही लोक आले. या व्यवहाराला विरोध करत दुसरा जत्था तेथे पोचला. त्यांच्यात सुरुवातीला बाचाबाची सुरू झाली. यानंतर हाणामारी व नंतर एकाने स्वत:कडील पिस्तुलातून गोळीबार केला. यातील एक गोळी सतीश क्षीरसागर यांच्या डाव्या पायास लागली. त्यात ते रक्तबंबाळ झाले. मारहाणीत फारुख सिद्दिकी यांच्या हनुवटीला दुखापत झाली. पोलिस अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक रश्मिता एन. राव, उपअधीक्षक संतोष साबळे, निरीक्षक केतन राठोड यांनी भेट दिली. आयबाईक तसेच मोबाईल फॉरेन्सिक फथकाने पाहणी केली. केतन राठोड, उपनिरीक्षक बाळराजे दराडे यांनी पंचनामा केला. काही कागदपत्रे व अन्य काही साहित्य ताब्यात घेतले.

डॉ. भारतभूषण क्षीरसागरांसह पुत्रावरही गुन्हा

गोळीबार प्रकरणी उशिरा घटनेत जखमी सतीश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलिस ठाण्यात माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, त्यांचे पुत्र माजी नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर, सतीश पवार, प्रमोद पवार, विनोद पवार, रवी पवार, आदित्य पवार आदी अशा नऊ जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंद झाला. तलवार, लाठी - काठ्या, दोन पिस्टल दांडे याद्वारे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आठ दिवसांपूर्वी भारतभूषण क्षीरसागर, योगेश क्षीरसागर व संतोष पवार यांनी बंगल्यावर आले तेव्हा जास्त हवेत उडू नका. फडफड करू नका असे म्हणत बघून घेऊ अशी धमकी दिली होती. कलेक्टर ऑफिसकडे जात असताना फारुक सिद्दीकी, सतीश क्षीरसागर व हेमंत क्षीरसागर यांना वरील आरोपींनी आवाज देऊन थांबवले असेही फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर वादावादी होऊन हल्ला केला. प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाळराजे दराडे करीत आहेत.

''जमीन खरेदी-विक्री व्यवहारातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येतील. हल्लेखोरांच्या मागावर पथके आहेत. गुन्हा नोंद झाल्यावर सर्व बाबी स्पष्ट होतील''

- आर. राजा, पोलिस अधीक्षक, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT