छत्रपती संभाजीनगर

बीडच्या रस्त्यांवर नियमांचा ‘खेळ’

CD
मेन ((या बातमीच्या बाजूलाच सेम विषयाची बातमी घ्यायची आहे.)) ----- बीडच्या रस्त्यांवर नियमांचा ‘खेळ’ ---- - एचएसआरपीच्या नियमाला फाटा - आरटीओ गतिमान की कागदी घोडे? - एकूण वाहने दोन लाख ३५ हजार - केवळ ९० हजार वाहनांकडून नोंदणी - ६४ टक्के गाड्या जुन्याच नंबर प्लेटवर ​- एक लाख ४५ हजार वाहनधारकांचा ठेंगा ------ नितीन चव्हाण बीड, ता. १५ : रस्त्यावरील गाड्यांचा सुळसुळाट आणि सुरक्षेच्या गप्पा मारणाऱ्या बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. एक एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले असले, तरी जिल्ह्यात या आदेशाची ऐशीतैशी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ‘एमएच २३’ या बीडच्या अधिकृत पासिंग असलेल्या एकूण दोन लाख ३५ हजार ६९६ वाहनांपैकी आजवर केवळ ९० हजार ३३४ वाहनांनीच या नंबरप्लेटसाठी ऑनलाइन बुकिंग केली आहे. टक्केवारीचा हिसाब लावला, तर हा आकडा अवघा ३८.३६ टक्के निघतो. म्हणजेच, बीड जिल्ह्यातील तब्बल ६१.६४ टक्के वाहने आजही सरकारी नियमांना धाब्यावर बसवून बिनधास्त फिरत आहेत. वाहनचोरीला आळा घालणे, गुन्हेगारी करण्यासाठी वापर केलेल्या गाड्यांचा मागोवा घेणे आणि अपघातप्रसंगी डिजिटल ट्रॅकिंग सुलभ व्हावे, यासाठी सर्वोच्च न्यायालय व केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, बीड आरटीओ प्रशासनाच्या संथ, सुस्तावलेल्या आणि कासवगतीच्या कारभारामुळे जिल्ह्यातील एक लाख ४५ हजार ३६२ वाहनांनी अद्याप नंबरप्लेटसाठी बुकिंगच केलेली नाही. प्रशासनाने वारंवार जाहीर केलेल्या डेडलाइन केवळ कागदावरच राहिल्या असून, सर्वसामान्य वाहनधारक या नियमाला साफ केराची टोपली दाखवत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. एकीकडे ३८.३६ टक्के एवढीच तुटपुंजी बुकिंग झालेली असताना, दुसरीकडे मात्र आरटीओकडून वाहनांची तपासणी करताना किंवा रस्ता सुरक्षेच्या नावाखाली अचानक दंडात्मक कारवायांचा धाक दाखविला जातो. प्रशासनाला १०० टक्के वाहनांना एचएसआरपी प्लेट लावणे अपेक्षित आहे, तर मग उरलेल्या ६१ टक्के वाहनांपर्यंत पोचण्यासाठी जनजागृती मोहीम का राबविली जात नाही? की केवळ वाहने अडवून मोठा दंड वसूल करण्यासाठीच नागरिकांना अंधारात ठेवले जात आहे? असा संतप्त सवाल आता बीडच्या वाहनधारकांमधून उपस्थित केला जात आहे. ------- फिटमेंटची गतीही संथ; चार हजार वाहने लटकली ​केवळ ऑनलाइन बुकिंग करूनच बीडचे नागरिक थांबले नसून, बुकिंग झालेल्या ९० हजार ३३४ वाहनांपैकी प्रत्यक्षात फक्त ८६ हजार ३०३ वाहनांवरच हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. म्हणजेच बुकिंग करूनही जवळपास चार हजार ३१ वाहनधारक आजही नंबरप्लेट लावण्यासाठी आरटीओ अथवा अधिकृत डीलर्सकडे चकरा मारत आहेत. आरटीओ आणि नंबरप्लेट पुरवठादार कंपन्यांच्या ढिसाळ समन्वयामुळे वाहनधारकांना हेलपाटे मारावे लागत असल्याची तीव्र ओरड होत आहे. ---- बीड एमएच-२३ चे ऑनलाइन रिपोर्ट कार्ड ​एकूण जुनी नोंदणीकृत वाहने (०१/०४/२०१९ पूर्वीची) : २,३५,६९६ ​झालेली एचएसआरपी बुकिंग : ९०,३३४ ​झालेले प्रत्यक्ष फिटमेंट (नंबरप्लेट बसवणे) : ८६,३०३ ​एकूण बुकींगची टक्केवारी : ३८.३६ टक्के ​अद्याप अपूर्ण/रिमेंडिंग वाहने : १,४५,३६२ ----- वाहनधारकांनो, दंड टाळण्यासाठी तत्काळ करा बुकिंग ​येणाऱ्या दिवसांत बीड आरटीओ प्रशासनाकडून हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (एचएसआरपी) नसणाऱ्या वाहनांवर अत्यंत कडक कारवाईची मोहीम उघडली जाण्याची शक्यता आहे. शहरातील मुख्य चौक, महामार्ग आणि तपासणी नाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून थेट हजारो रुपयांचे ई-चालान फाडण्यात येणार आहे. आरटीओने आपली यंत्रणा तत्पर करावीच; पण त्यासोबतच एमएच-२३ पासिंग असणाऱ्या सर्व वाहनधारकांनी दंड आणि संभाव्य कायदेशीर अडचण टाळण्यासाठी तातडीने अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन बुकिंग करून आपल्या वाहनावर एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्यावी. ----- घरबसल्या सोप्या पद्धतीने करा बुकिंग ​एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठी आरटीओ किंवा एजंटचे हेलपाटे मारण्याची अजिबात गरज नाही. सोप्या पद्धतीने घरबसल्या ऑनलाइन बुकिंग करा. ​www.bookmyhsrp.com या वेबसाइटला भेट द्या किंवा अधिकृत पोर्टलवर जा. आपला गाडी क्रमांक, चेसीस नंबर आणि इंजिन नंबर टाका, तुमच्या सोयीनुसार जवळचा डीलर किंवा घरपोच सेवा आणि तारीख-वेळ निवडा, ऑनलाइन पेमेंट पूर्ण करून मिळणारी पावती डाउनलोड करा.​ ठरलेल्या दिवशी वाहनासह जाऊन ५ मिनिटांत हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवून घ्या. ---- ((कोट)) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट लावणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. जिल्ह्यातील ज्या वाहनधारकांनी अद्याप ऑनलाइन नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करून घ्यावी. वाहनांची सुरक्षितता आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. लवकरच तपासणी मोहीम तीव्र करण्यात येईल. - बालाजी धनवे, आरटीओ, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT