छत्रपती संभाजीनगर

बीड जिल्ह्यात २९ सप्टेंबरला १६ ठिकाणी रोजगार महाकुंभ; सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

CD
जिल्ह्यात १६ ठिकाणी रोजगार महाकुंभ १८ ते ४५ वयोगटातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी --- ​बीड, ता. ११ ः जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना एकाच छताखाली नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवारी (ता. २९) जिल्ह्यात १६ ठिकाणी रोजगार महाकुंभ मेळावा होणार आहे. राज्यभरात राबवण्यात येणाऱ्या ५०० पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचा एक भाग म्हणून जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या वतीने हा महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती या संकल्पनेवर हा उपक्रम राबवला जात आहे. या मेळाव्यात १८ ते ४५ वयोगटातील पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधी मिळतील. जिल्ह्यातील १६ प्रमुख महाविद्यालये व आयटीआय केंद्रांवर या महाकुंभचे आयोजन केले जाणार आहे. बंकट स्वामी महाविद्यालय, के.एस.के. महाविद्यालय, सावरकर महाविद्यालय, जन शिक्षण संस्थान आणि स्व. विनायकराव मेटे शासकीय आयटीआय. खोलेश्वर महाविद्यालय व शासकीय कृषी महाविद्यालय (अंबाजोगाई), वसंतदादा पाटील महाविद्यालय (पाटोदा), कालिका देवी महाविद्यालय (शिरूर कासार), आर.बी.अट्टल महाविद्यालय (गेवराई), सिद्धेश्वर महाविद्यालय (माजलगाव), जिजाऊ महाविद्यालय (धारूर), ताराबाई महाविद्यालय (वडवणी), शासकीय आयटीआय (आष्टी), गोपीनाथ मुंडे शासकीय आयटीआय (मलकापूर, परळी) आणि महादजी शिंदे शासकीय आयटीआय (केज). या मेळाव्यात बँक, पतसंस्था, मल्टिस्टेट, हॉस्पिटल्स, ऑटोमोबाईल्स, पेट्रोल पंप आणि साखर कारखान्यांसह सर्व खाजगी उद्योगांना रिक्त पदांची माहिती गुगल लिंकद्वारे किंवा प्रशासनाकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी तातडीने महास्वयं पोर्टलला भेट देऊन आपली ऑनलाइन नोंदणी करावी आणि या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Kuldeep Yadav: एकाच सामन्यात १० विकेट्स... कुलदीपचा इंग्लंडमध्ये कहर! नोंदवली सर्वोत्तम कामगिरी

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

SCROLL FOR NEXT