Politics in the lockdown of Ahmednagar
Politics in the lockdown of Ahmednagar 
छत्रपती संभाजीनगर

लॉकडाउनमध्ये विक्री; मोंढ्यात नऊ दुकाने सील

दत्ता देशमुख

बीड : कोरोना विषाणू संसर्गाची (Coronavirus Infection) साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात (Beed) लॉकडाउन आहे. असे असतानाही पहाटेपासूनच दुकाने उघडून किराणा साहित्य विक्री करणारी नऊ दुकाने सील करून दुकान मालकांवर गुन्हे नोंद करण्यात आले. रविवारी (ता. नऊ) तहसीलदार शिरीष वमने व पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या पथकाने जुना मोंढा भागात ही कारवाई केली. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव आटोक्यात येत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कडक लॉकडाउन सुरू आहे. अगदी अत्यावश्यक सेवेत मोडणारे किराणा दुकानेही (Grocery Shops) बंदचे आदेश आहेत. (Beed Latest News In Lock Down Selling, Cases Filed Against Nine Shops)

असे असताना रविवारी मोंढा भागात पहाटेपासूनच दुकानांतून साहित्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून तहसीलदार शिरीष वमने व पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. यावेळी श्रीनिवास ट्रेडर्स, पारस ट्रेडिंग कंपनी, श्री. सुपर मार्केट, आनंद सेल्स कार्पोरेशन, स्वागत ट्रेडर्स, व्यंकटेश ट्रेडर्स आदी नऊ दुकानांतून विक्री सुरू असल्याचे आढळल्याने दुकाने सील करून मालकांवर गुन्हे नोंद करण्यात आले. शेख अन्सार शेख मोईज यांच्या फिर्यादीवरून शेख जाहीर शेख शब्बीर, सुलेमान युनूस मोमीन, शेख जावेद शेख रौफ, गणेश दत्तात्रेय निर्मळ, योगेश सुभाष कदम, मोहम्मद जाफर बेग, प्रफुल्ल विनोदकुमार दरडा, तांबोळी नवशाद तांबोळी युनूस, संतोष आदीनाथ रोटेकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. कारवाईमुळे चोरून विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT