छत्रपती संभाजीनगर

चिमुकल्याचा जीव वाचविण्यासाठी आईने पाण्यात मारली उडी, दोघांचाही बुडून मृत्यू

जवळच खेळत असलेला समर्थ पाण्यात गेल्याने तो गोदापात्रात बुडू लागला होता. यावेळी त्याला वाचविण्यासाठी त्याची आई पल्लवी ढाकणेने पाण्यात उडी मारली.

वैजीनाथ जाधव

गेवराई (जि.औरंगाबाद) : तालुक्यातील संगम जळगावजवळील गोदापात्रात (Govdavri River) बुडून आईसह पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी (ता.नऊ) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात (Gevrai Sub District Hospital) दाखल करण्यात आले आहेत. पल्लवी गोकुळ ढाकणे (वय २६ ) व तिचा मुलगा समर्थ गोकुळ ढाकणे (वय ५ , दोघे रा.संगम जळगाव) अशी मृताची नावे असुन नेहमी प्रमाणे गोदापात्रात कपडे धुण्यासाठी ही महिला आपल्या पाच वर्षाच्या चिमुकल्यासोबत गेली होती. (Beed Latest News Mother And Son Drowned In Gevrai)

यावेळी जवळच खेळत असलेला समर्थ पाण्यात गेल्याने तो गोदापात्रात बुडू लागला होता. यावेळी त्याला वाचविण्यासाठी त्याची आई पल्लवी ढाकणेने पाण्यात उडी मारली. परंतु दोघांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. मृताचे शवविछेदन करण्यासाठी मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : शिर्डीला देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! कंटेनरने दुचाकीला पाऊण किलोमीटर फरफटत नेलं, 30 वर्षीय डाॅक्टरसह तिघांचा दुर्दैवी अंत

पोलिसांनी गळा पकडला, मारहाण अन् शिविगाळ केली! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसोबत भयानक घडलं; बोर्डाची चौकशीची मागणी

Kharif Season: खरीपपूर्वी शेतकऱ्यांना मोठा झटका! खतांच्या दरात मोठी वाढ, DAP-युरियाच्या तुटवड्याने चिंता वाढली

IAF Plane Crash हवाई दलाच्या विमानाचे लँडिंगनंतर दोन तुकडे, आगीचा भडका; ५ अधिकाऱ्यांचा मृत्यू

Inspector Manju: गावाकडच्या काकूंची सत्यावर माया; सेटवर येऊन चक्क सोन्याची वस्तू केली गिफ्ट!

SCROLL FOR NEXT