आष्टी (जि.बीड) : तालुक्यात वैद्यकीय अधिकारी विशाल वनवे यांना पोलिसांनी मारहाण केली. आष्टी (जि.बीड) : तालुक्यात वैद्यकीय अधिकारी विशाल वनवे यांना पोलिसांनी मारहाण केली.
छत्रपती संभाजीनगर

वैद्यकीय अधिकाऱ्यास पोलिसांकडून मारहाण, आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

आष्टी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विशाल वनवे हे आपले कर्तव्य बजावून गावाकडे सायंकाळी निघाले होते. त्यांना चऱ्हाटा येथे पोलिसांनी अडविले व कुठून आला, कुठे चालला असे अर्वाच्यभाषेत विचारले.

अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (जि.बीड) : संचारबंदीच्या (Curfew) अंमलबजावणीसाठी सध्या पोलिस कारवाई करीत आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेतील (Essential Services) कर्मचाऱ्यांची कोणतीच खात्री न करता त्यांनाही मारहाण करणे, अडवून दंड करण्याचा प्रकार जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. तालुक्यातील टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे (Primary Health Centre) वैद्यकीय अधिकारी डाॅ. विशाल वनवे( Medical Officer Vishal Vanave) यांना बीड (Beed) येथील चऱ्हाटा फाट्यावर पोलिसांनी बेदम मारल्याच्या निषेधार्थ आष्टी (Ashit) तालुका आरोग्य संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता.सहा) कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील लसीकरणही खोळंबले आहे. (Beed Live Updates Police Beaten Medical Officer In Ashti Block)

याबाबत तालुक्यातील आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, बुधवारी सायंकाळी आष्टी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विशाल वनवे हे आपले कर्तव्य बजावून गावाकडे सायंकाळी निघाले होते.त्यांना चऱ्हाटा येथे पोलिसांनी अडविले व कुठून आला, कुठे चालला असे अर्वाच्यभाषेत विचारले. सदरील डाॅक्टरांनी आपल्याकडील असलेले ओळखपत्र दाखविले व मी आताच ड्युटी करून आलो आहे. आता घरी चाललो आहे. असे सांगत असतानाच एका पोलिस कर्मचाऱ्याने कसलाच विचार न करता पाठीमागून काठी मारली व तीन-चार पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली.

याबाबत डाॅ. विशाल वनवे यांनी तक्रार केली असून, आष्टी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी या मारहाणीचा निषेध केला असून, जोपर्यंत संबंधित पोलिसांवर कारवाई होत नाही. तोपर्यंत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर डाॅ. प्रसाद वाघ, डाॅ. दत्ता जोगदंड, डाॅ. दीपक शेळके, डाॅ. सचिन पाळवदे, डाॅ. नितीन राऊत, डाॅ. नारायण वायभसे या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, आज दिवसभर तालुक्यात कोठेच लसीकरणही होणार नसल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT