पान ४ अँकर
----
बीडच्या झेडपी शाळांतील लेकींची थेट ‘नासा’मध्ये गगनभरारी
ग्रामीण टॅलेंट झेपावणार अमेरिकेत; ग्रामीण टॅलेंट झेपावणार अमेरिकेत
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. ५ ः जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांची स्वप्ने सहसा गावाच्या वेशीवरच मर्यादित राहतात, हा समज आता खोटा ठरला आहे. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील झेडपी शाळांमधील लेकींनी थेट अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासा आणि भारताच्या इस्रोकडे गगनभरारी घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक सहलीच्या निवड चाचणीत ३३ गुणवंतांची अंतिम यादी जाहीर झाली असून, यात तब्बल २२ (६७ टक्के) मुलींनी बाजी मारत ऐतिहासिक यश मिळवले आहे.
नासा व इस्रो शैक्षणिक सहलीसाठी बीड जिल्ह्यातून तब्बल १४ हजार ५८० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तीन कठीण टप्प्यांतील चाचण्यांमधून अंतिम ३३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मागील वर्षी या उपक्रमातून केवळ एक मुलगी नासासाठी पात्र ठरली होती. यंदा मात्र चित्र पूर्णपणे बदलले असून, अकरा तालुक्यांतील प्रथम क्रमांकाच्या ११ विद्यार्थ्यांपैकी तब्बल सात मुलींनी थेट अमेरिकेतील ''साचे तिकीट पटकावले आहे.
ही परीक्षा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी क्यूआर कोड आणि झूम वेबकास्टिंगसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. गैरप्रकारांना आळा घातल्यामुळे खऱ्या आणि होतकरू गुणवत्तेला न्याय मिळाला. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना थेट जागतिक पातळीवरील अंतराळ विज्ञानाचे धडे गिरवण्याची संधी मिळाल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यातून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
-----
‘नासा’आणि ‘इस्रो’ अशा दोन्ही सहलींचे मानकरी
मुली (७): क्रांती सोनटक्के (अंबाजोगाई), सिद्धी केदार (बीड), स्वप्नाली देवकर (गेवराई), प्रणवी मुळे (केज), तृप्ती अंभूरे (माजलगाव), श्रेया शेळके (पाटोदा), ऋतुजा केदार (शिरूर).
मुले (४): यश झांजे (आष्टी), राजवीर सोळंके (धारूर), सार्थक आघाव (परळी), श्रेयश कदम (वडवणी).
-------------------
‘इस्रो’ सहलीसाठी निवडलेले विद्यार्थी (२२ विद्यार्थी)
तालुक्यातून द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची इस्रो (बेंगळुरू/श्रीहरिकोटा) सहलीसाठी निवड झाली आहे.
अंबाजोगाई: सिद्धी गंगणे, प्रतीक्षा थोरात
आष्टी: शिवांश गव्हाणे, समृद्धी महाजन
बीड: कृष्णा सानप, गौरी कुऱ्हाडे
धारूर: कृष्णा भोसले, रचना भिसे
गेवराई: आदित्य भोसले, तन्वी परदेशी
केज: धनश्री वरपे, अश्विनी शिंपले
माजलगाव: सम्राट मोरे, संस्कृती जाधव
परळी: रुपाली सोळंके, सायली दहीफळे
पाटोदा: विकास सानप, अवनी पवार
शिरूर: समर्थ उगले, सान्वी केदार
वडवणी: संस्कृती कदम, श्रावणी कदम.
-----
कोट
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या लेकींनी यंदा ऐतिहासिक यश मिळवत थेट नासाचे तिकीट पटकावले आहे. पारदर्शक परीक्षा प्रक्रियेमुळे खऱ्या अर्थाने गुणवत्तेला न्याय मिळाला. अंतिम ३३ पैकी तब्बल २२ मुलींनी या परीक्षेत बाजी मारली आहे. हा निकाल म्हणजे आमच्या लाडक्या लेकींच्या जिद्दीचा मोठा विजय आहे."
- जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), बीड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.