बीडच्या सहा ज्येष्ठ चालकांचा १०
हजारांच्या सन्मान निधीने गौरव
-----
बीड, ता. ९ : रात्रंदिवस प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करणाऱ्या ज्येष्ठ वाहतूक चालकांच्या प्रदीर्घ सेवेची दखल घेत राज्य सरकारने त्यांचा गौरव केला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीतील सहा पात्र ज्येष्ठ चालकांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा सन्मान निधी प्रदान करण्यात आला.
ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे तीन सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छितस्थळी पोचविणाऱ्या चालकांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या २० मे २०२६ रोजीच्या निर्णयानुसार मंडळाच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे ऑटोरिक्षा, टॅक्सी यांसह सर्व प्रकारच्या पात्र प्रवासी वाहनांचे बॅज व परवानाधारक चालकांना मंडळाचे सभासदत्व मिळू शकणार आहे.
-----
विविध योजनांचा लाभ
मंडळाच्या माध्यमातून चालकांना निवृत्ती सन्मान निधी, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास आर्थिक मदत, जीवन व अपंगत्व विमा संरक्षण, आरोग्यविषयक लाभ तसेच चालकांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती व कौशल्यवृद्धी कार्यक्रमांचा लाभ मिळणार आहे. बीड जिल्ह्यातील पात्र प्रवासी वाहनचालकांनी अद्याप नोंदणी केली नसल्यास मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा किंवा बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेश आव्हाड यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.