छत्रपती संभाजीनगर

शहरातील भाजी मंडईत

CD
शहरातील रस्त्यांवरच विक्रेत्यांची दुकाने बशीरगंज चौक ते सुभाष रोडदरम्यान वाहतुकीचा खोळंबा; भाजी मंडईत रस्त्याच्या मध्यभागी दुकाने ----- बीड, ता. ८ : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी होत असताना शहरातील बशीरगंज चौक ते सुभाष रोडदरम्यान वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी विक्रेत्यांनी दुकाने थाटली असतानाच मुख्य भाजी मंडईतील रस्त्याच्या मध्यभागीही दिवाळी साहित्याची दुकाने मांडण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना बाजारपेठेतून चालणेही कठीण झाले असून, दुचाकीचालकांचीही मोठी गैरसोय होत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. कपडे, सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य, पणत्या, रांगोळी, फुले यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक बाजारपेठेत येत आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यंदा दिवाळीचा बाजार छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर भरविण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले होते. क्रीडांगणावर काही विक्रेत्यांनी दुकानेही थाटली आहेत. मात्र, तरीही मुख्य भाजी मंडईत अनेक विक्रेत्यांनी बशीरगंज चौक ते सुभाष रोडदरम्यान रस्त्याच्या मध्यभागीच दुकाने मांडली आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीचालकांना वाहन चालविण्यासाठी पुरेशी जागाही शिल्लक राहिलेली नाही. परिणामी, या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनाही गर्दीतून वाट काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे चित्र आहे. ----- नियोजनाचा अभाव नागरिकांच्या माथी सणासुदीच्या काळात बाजारपेठेत गर्दी होणार, याची कल्पना पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांना असतानाही ठोस नियोजन केल्याचे दिसत नाही. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाचा पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतरही रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे, विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करणे आवश्यक होते. मात्र, या उपाययोजनांचा अभाव असल्याने बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ----- ABD26J82932 बीड : भाजी मंडईत रस्त्याच्या मध्यभागी थाटलेल्या दुकानांमुळे झालेली वाहतूक कोंडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde Midnight Raid and First Posting Revelations : आयुक्त तुकाराम मुंढेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; २००७ मधील पहिल्याच पोस्टिंगच्या वेळी मध्यरात्रीच्या धाडीचा थरारक किस्सा अन् 'त्या' फोन कॉलबद्दल केला खुलासा

Pimpri Chinchwad fire brigade : गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या ७० घटना; यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये २० अग्निशमन वाहने सज्ज, २२ संवेदनशील ठिकाणांवर २४ तास लक्ष

बॉस असावा तर असा! दिवाळीला प्रत्येकाला दिला १ लाखांचा बोनस, कर्मचारी भावुक; Video Viral

Latest Marathi News Live Update: : पार्थ पवारांची शरद पवारांसोबत तब्बल दोन ते अडीच तास महत्त्वपूर्ण बैठक; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान भेटीने वेधले राजकीय वर्तुळाचे लक्ष

Mega Clean River Mission 2029 Deadline : "२०२९ आधी नदी पूर्ण स्वच्छ करूनच जनतेसमोर येणार!"; तब्बल ८,९४१ कोटींच्या मेगा प्लॅनची घोषणा, गृहमंत्र्यांचा मोठा संकल्प

SCROLL FOR NEXT