छत्रपती संभाजीनगर

योजना बातमी बीड

CD
योजनेवर कोट्यवधींची उधळपट्टी, तरीही पाण्यासाठी वणवण बीडकरांचा घसा कोरडाच; १५ ते २० दिवस नळाला नाही पाणी सकाळ वृत्तसेवा बीड, ता. ३१ : एका बाजूला शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तब्बल ११४ कोटी रुपयांची ‘अमृत योजना’ राबवली जात आहे, तर दुसरीकडे बीडकरांना पाण्यासाठी चक्क १५ ते २० दिवस चातकासारखी वाट पाहावी लागत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी अक्षरशः पाण्यात गेला असून, नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. अमृत मिळण्याची स्वप्ने पाहणाऱ्या बीडकरांच्या नशिबी पाण्याचा केवळ हाहाकारच उरला आहे. बीड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जलस्वयंपूर्णतेसाठी मोठी स्वप्ने दाखवली गेली. नियमानुसार प्रत्येक नागरिकाला दररोज १३५ लिटर पाणी मिळणे अपेक्षित आहे. यासाठी केंद्र सरकारच्या बहुचर्चित अमृत योजनेअंतर्गत तब्बल ११४ कोटी रुपयांची भरघोस पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली. बिंदुसरा प्रकल्प आणि माजलगाव धरणाच्या पाण्यावर शहराची मदार होती. मात्र, २०१७ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी केवळ कागदावर खर्च केला, परंतु प्रत्यक्षात नागरिकांच्या नळाला पाण्याचा थेंबही नियमित आलेला नाही. प्रशासनाच्या या सुस्त आणि नियोजनशून्य कारभारामुळे जनतेचा संताप अनावर झाला आहे. शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज ४० ते ४२ एमएलडी पाण्याची गरज भासते. प्रत्यक्षात बिंदुसरा धरणातून केवळ ४ एमएलडी पाणी मिळते आणि माजलगाव धरणातून मिळणारे पाणीही अत्यंत अपुरे पडत आहे. त्यातच जुन्या व गळक्या जलवाहिन्या आणि अनधिकृत नळजोडण्यांवर नियंत्रण ठेवण्यात पालिका पूर्णपणे अपयशी ठरली आहे. सर्वांत संतापजनक बाब म्हणजे, जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली पालिका दरवर्षी तब्बल १ कोटी २० लाख रुपयांची (मासिक १० लाख रुपये) उधळपट्टी करते. एवढा मोठा खर्च होऊनही पाण्याची गळती सुरूच आहे. परिणामी, शहराच्या अनेक भागांत १५ ते २० दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांना टँकर आणि विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ------ टँकरचे नियोजन अन् प्रशासनाची उदासीनता नळाला पाणी येत नसल्याने शहरात ११ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जातो. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या आणि पाणीटंचाईची भीषणता पाहता हे टँकर ऊन-पाण्यात पूर्णपणे अपुरे पडत आहेत. नवीन टँकर सुरू करण्यासाठी शासनाकडे अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागरिकांची पाण्यासाठी तीव्र मागणी असतानाही प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. दुसरीकडे, बिंदुसरा प्रकल्पात केवळ ०.२५३ दलघमी इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक उरल्याने बीड शहरावरील पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे.

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

Mumbai Metro 4: स्वयंचलित पहिली मेट्रो सज्ज! दिवाळीनंतर मुंबईत दाखल होणार; कसा असेल प्रवास? पाहा वैशिष्ट्ये

Marathi News Live Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

स्टार प्रवाहच्या नायकाची झी मराठीवर एंट्री; झळकणार नव्या कार्यक्रमात, ओळखलंत का ठकुबाईच्या नातवाला?

Pune News : पुण्यातील महाविद्यालयात व्यसनमुक्ती अभियान; पोस्टर आणि घोषवाक्यांतून विद्यार्थ्यांची जनजागृती

SCROLL FOR NEXT